जलालखेडा येथे २९७ नागरिकांची आराेग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:20+5:302021-01-20T04:09:20+5:30

जलालखेडा : स्थानिक एस. आर. के. इंडाे पब्लिक स्कूलच्या प्रांगणात डिगडाेह हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्यावतीने राेगनिदान व रक्तदान ...

Health check-up of 297 citizens at Jalalkheda | जलालखेडा येथे २९७ नागरिकांची आराेग्य तपासणी

जलालखेडा येथे २९७ नागरिकांची आराेग्य तपासणी

googlenewsNext

जलालखेडा : स्थानिक एस. आर. के. इंडाे पब्लिक स्कूलच्या प्रांगणात डिगडाेह हिंगणा येथील लता मंगेशकर हाॅस्पिटलच्यावतीने राेगनिदान व रक्तदान शिबिराचे मंगळवारी (दि. १९) आयाेजन करण्यात आले हाेते. यात २९७ नागरिकांच्या आराेग्याची माेफत तपासणी करण्यात आली असून, यातील १०४ रुग्णांची पुढील उपचारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्यावर लता मंगेशकर हाॅस्पिटलमध्ये माेफत उपचार व गरज भासल्यास शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. शिवाय, २६ तरुणांनी रक्तदान केले.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डाॅ. आशिष देशमुख, शाळेचे पालक संचालक दिलीप हिवरकर, माजी सरपंच प्रतिभा घोरमाडे, माजी उपसरपंच महेंद्र कुवारे, कुलदीप हिवरकर, प्रमोद पेठे, सुधीर खडसे, दिनकर राऊत, श्रावण माकोडे, अतुल पेठे, पांडुरंग घोरमाडे, प्रताप वानखडे, दीपक कळंबे, रामचंद्र लिखार, आनंद मंगल, गिरीश शुक्ला, बबन लोहे, मेहबूब बानवा, पुरुषोत्तम पांडव, प्राचार्य शुभांगी अर्डक, ज्ञानेश्वर अंतुरकर उपस्थित हाेते. यावेळी अतिथींच्या हस्ते काेराेना संक्रमण काळात सेवा प्रदान करणाऱ्या डाॅ. उमेश देशमुख, डॉ. माधुरी देशमुख, डॉ. ललित धोटे, डॉ. प्रशांत वैखंडे, डॉ. मृणालिनी हिवरकर, आरोग्य कर्मचारी वंदना ईश्वरकर, जयश्री सावरकर, मुकेश बिहार, गणेश कळंबे, लीलाधर पारिसे, आरोग्य सहायक पठाण तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा कवरे, पूर्वी डांगरे, सचिन भिल्लम, नरेश रामपुरे, पद्माकर धुंडे, नरेश रामपुरे यांचा गाैरव करण्यात आला. शिबिरात डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. केतन डागडिया, डॉ. प्रतीक बुरड, डॉ. श्रुतिका भेलकर यांच्यासह सहकाऱ्यांनी सेवा प्रदान केली. या शिबिराचा स्थानिक व परिसरातील गावांमधील नागरिकांनी लाभ घेतला.

Web Title: Health check-up of 297 citizens at Jalalkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.