४४६ नागरिकांची आराेग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:09 AM2021-01-25T04:09:28+5:302021-01-25T04:09:28+5:30
काटाेल : लता मंगेशकर हाॅस्पिटल डिगडाेह, हिंगणा यांच्यावतीने काटाेल येथे राेगनिदान व रक्तदान शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. ...
काटाेल : लता मंगेशकर हाॅस्पिटल डिगडाेह, हिंगणा यांच्यावतीने काटाेल येथे राेगनिदान व रक्तदान शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ४४६ नागरिकांची आराेग्य तपासणी करून ६६ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली, तसेच ३६ तरुणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन माजी आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश पर्बत, दिनकर राऊत, दीपक पटेल, विजय महाजन, सोपान हजारे उपस्थित हाेते. डॉ. काजल मित्रा, डॉ. हरकरे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. किशोर ढोबळे यांनी रुग्णांना सेवा प्रदान केली. यात नागरिकांची चर्मरोग, अस्थिरोग, दंत रोग, स्त्रीरोग, बालरोग, रक्तदाब, ब्लडशुगर तसेच रक्त तपासणी करण्यात आली. काेराेना संक्रमण काळात नागरिकांना सेवा प्रदान करणाऱ्या डॉ. अरविंद गोतमारे, डॉ. सचिन घाटे, डॉ. सचिन चिंचे, डॉ. शुभांगी चिंचे, डॉ. सुनीता सावरकर, डॉ. अमोल करांगळे, डॉ. वानखेडे, डॉ. चेतन रेवतकर, डॉ. अनिल बन्सोड, डॉ. सुधीर वाघमारे, डॉ. नरेंद्र डोमके, डॉ. शशांक व्यवहारे, डॉ. दिनेश डवरे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. किशोर ढोबळे, डॉ. भावना जेवडे, डॉ. रूपल दरक, डॉ. अनुप्रिता, मीना पवार, शामल भेंडे यांचा गाैरव करण्यात आला.