हेल्थ लायब्ररी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:08 AM2021-03-28T04:08:10+5:302021-03-28T04:08:10+5:30

मागील दोन दिवसात देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० हजारावर गेली आहे. यात महाराष्ट्रात अधिक रुग्ण आढळत आहेत. कोविड ...

Health Library | हेल्थ लायब्ररी

हेल्थ लायब्ररी

Next

मागील दोन दिवसात देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० हजारावर गेली आहे. यात महाराष्ट्रात अधिक रुग्ण आढळत आहेत. कोविड १९ ची ही दुसरी लाट १०० दिवसापर्यंत राहणार असून, याचा टप्पा एप्रिलच्या उत्तरार्धात येण्याची शंका आहे.

- दुसरी लाट कशी वेगळी आहे?

- यावेळी कोरोना व्हायरस अधिक वेगाने पसरत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात. प्रभावित रुग्णांची संख्या आणि त्यांची ऑक्सिजन, रेमेडेसिवर, टोसिलुजिमॅबची गरज आणि दुसऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्सची गरज खूप अधिक आहे. यावेळी मृत्यूचा दरही अधिक आहे. रुग्णालयात राहण्याचा कालावधीही वाढला आहे.

अखेर असे कशामुळे झाले?

- पहिल्या टप्प्यात आमच्या अनुभवानंतरही आम्ही आत्मसंतुष्ट झालो. दुसऱ्या लाटेचा आम्ही विचारच केला नाही की ही लाट पूर्वीपेक्षाही धोकादायक असेल. दुसऱ्या देशातील दुसऱ्या लाटेचा सामना केलेल्या देशांकडून भारताने धडा घ्यायला हवा होता. आम्ही दुसरी लाट इतकी धोकादायक आणि इतका काळ टिकेल, याची कल्पनाही केली नव्हती.

लॉकडाऊन व्हायरस रोखण्यासाठी आवश्यक आहे?

स्थानिक लॉकडाऊन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अपयशी ठरला आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आपण पाहू शकतो. संक्रमितांची संख्या आणि मृत्यूवर लॉकडाऊन किंवा प्रतिबंध घालणे, याचा परिणाम दिसत नाही. अनेक राज्यात मृत्यूदर आणि नव्या संक्रमणाच्या घटना जिल्हास्तरापर्यंत वाढतच आहेत.

आता पुढे योग्य आणि आवश्यक पाऊल कोणते?

- कमीतकमी वेळात अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण, हा एकमेव पर्याय आहे. मास्क घालणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा वापर आणि शारीरिक अंतर ठेवल्यामुळे निश्चितच मदत मिळाली. परंतु कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेला थांबवता आले नाही.

भारतात लसीकरणाची सद्यस्थिती?

- कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची दररोजची उत्पादन क्षमता ५२ लाख आहे. भारतात दररोज डोसची संख्या ३४ लाखावरून वाढवून १ कोटी करण्याची क्षमता आहे. जर अधिक नागरिक व्हॅक्सिन घेण्यासाठी तयार होत असतील तर, डोसची संख्या ३४ लाखाहून वाढवून ४० ते ४५ लाखापर्यंत नेता येऊ शकते. तेव्हा ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण चार महिन्यात पूर्ण केले जाऊ शकते. या पद्धतीने पूर्ण लोकसंख्या एक वर्ष नऊ महिन्यात व्हॅक्सिन मिळवू शकते.

लसीकरणाचा दर वाढवून लसीकरण अभियान यशस्वी कसे करावे?

- आम्ही जर आपल्या लसीचे उत्पादन वाढवून पुढील तीन महिन्यात १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व जणांना लस दिल्यास आम्ही या लाटेला रोखून तिसऱ्या लाटेपासून वाचू शकतो. सर्व हायस्कूल आणि महाविद्यालय उघडा. सर्वांना आत येण्यापूर्वी लस घेणे बंधनकारक करा. मॉल्स, हॉटेल्स उघडून लस घेतलेल्या व्यक्तींनाच आत प्रवेश द्या. लस घेतलेल्या नागरिकांनाच सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेचा वापर करू द्यावा.

कुणी लस घेतली याची माहिती कशी मिळेल?

- लसीकरणाच्या प्रमाणपत्रासोबत निवडणुकीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या न मिटणाऱ्या शाईचा वापर केला जाऊ शकतो.

आम्ही दुसरी लाट रोखण्यात अपयशी ठरलो काय?

- दुसरी लाट इतक्या वेगाने पसरेल याची शंका आम्हाला नव्हती. सामाजिक भेटीगाठी, लग्न, रिसेप्शन यासारख्या समारंभापासून आम्ही दूर राहायला हवे होते. आम्ही १९६५, १९७१ आणि कारगिलच्या युद्धाला गंभीरपणे घेतले होते. कोरोनाच्या बाबतीतही तसेच व्हायला हवे होते. मृत्यूचा दर अधिक असताना कोरोना विरुद्धच्या लढाईत त्या युद्धासारखा उत्साह, जनतेचा सहभाग नाही.

कोणत्या बाबीची अडचण आहे?

- कोविड १९ ची दुसरी लाट इतर राज्यांच्या निवडणुकांदरम्यान आली असून, संक्रमणाचा धोका अधिक आहे. उन्हाळ्यात संक्रमण अजून वाढणार काय, हे स्पष्ट नाही. आर्थिक मंदी रम्यान मध्यम व अल्प उत्पन्न असलेले परिवार कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा उपचार खर्च कसे उचलतील? ही शेवटची लाट आहे की पुन्हा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आणखी लाट येईल, हे स्पष्ट नाही.

...........

Web Title: Health Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.