हेल्थ लायब्ररी : आयुष्य जास्त असू शकते का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:09+5:302021-09-19T04:08:09+5:30
- दीर्घायुष्याबद्दल तीन दृष्टिकोन काय आहेत? पहिले म्हणजे घालण्यायोग्य असलेल्या वस्तू, स्वत:हून केल्या जाणा-या चाचण्या, आहार आणि आरोग्यसेवेत डिजिटल ...
- दीर्घायुष्याबद्दल तीन दृष्टिकोन काय आहेत?
पहिले म्हणजे घालण्यायोग्य असलेल्या वस्तू, स्वत:हून केल्या जाणा-या चाचण्या, आहार आणि आरोग्यसेवेत डिजिटल माध्यमांची मदत व कर्करोगाचे लवकर होणारे निदान हे तीन दृष्टिकोनाचा दीर्घायुष्यी होण्यास मदत ठरत आहे. विशेष म्हणजे, यात रेडिओलॉजीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पुढील दशकात उपलब्ध होणारे तंत्रज्ञान केवळ वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतीलच नाही तर ते उलटही होण्याची शक्यता आहे. यात जीन थेरपी, पुनरुत्पादक औषधे आणि वृद्धत्वाची प्रक्रिया थांबविणारी औषधे समाविष्ट आहेत. पुढील ५० वर्षांमध्ये, संपूर्ण अवयव प्रत्यारोपण, मशिन-मेंदूचे एकीकरण आणि ‘इंटरनेट आॅफ बॉडी’ शक्य होईल.
- वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावली तर आपण जास्त काळ कसे जगू शकतो?
जुनाट आजारांमुळे वृद्धांचा सर्वाधिक मृत्यू होतो. वृद्धत्व हे जगातील मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. वृद्धत्वाची प्रक्रिया कमी केल्याने टाइप-२ मधुमेह, हृदयरोग, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन आणि कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
- आजच्या दृष्टिकोनातून तज्ज्ञांचे मत?
काही सकारात्मक पावले आजपासून उचलल्यास तुमचे आयुष्य १० वर्षांनी वाढू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवृत्त न होण्याचा निर्णय. अनेक तज्ज्ञांच्या मते, निवृत्त होण्याचा विचार हा सर्वात दुर्बल करणारा रोग आहे.
- वय वाढवण्यासाठी कोणत्या सवयी बदलाव्या लागतील?
धूम्रपान आणि तंबाखू सोडायला हवे. अल्कोहोलही टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. लॉरा बर्मन यांच्या मते, अपराधीपणाचा व पश्चातापाचा विचार मागे सोडून आपण भविष्याचा विचार करायला हवा. जीवनशैलीतील बदल आपल्याला तरुण ठेवतात. आहारातून चरबी कमी करून ‘ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स’ वाढवायला हवे. अधिक भाज्या आणि फळे खायला हवे. प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांनी हे समोर आले आहे की, ३० टक्क्याने आहार कमी केल्याने आयुष्य वाढते.
- वृद्धत्वाची प्रक्रिया कशी कमी करता येईल?
जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहायला हवे. नियमित व्यायाम करायला हवे. विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवी विज्ञान क्षेत्रात होत असलेल्या संशोधनातील आवड वाढवायला हवी. नकारात्मक लोकांना दूर ठेवायला हवे. प्रत्येक दिवसाच्या शेवटी आव्हानांवर केलेला विजयाचे आकलन करायला हवे. येणारा दिवस अधिक चांगला आणि अधिक प्रभावी करण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवे.
-प्राण्यांवर होत असलेल्या प्रयोगांची स्थिती?
अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, रेटिना पेशींच्या अनुवांशिक प्रोग्रामिंगद्वारे उंदीरांची दृष्टी पूर्ववत होऊ शकते. रेटिनाच्या पेशींना अशा प्रकारे प्रोग्राम केले की, अध:पतनाची प्रक्रिया मंदावली किंवा त्याच्या उलट झाली.
-इस्रायली शास्त्रज्ञांचे नवीनतम प्रयोग कोणते होते?
६४ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ३५ स्वयंसेवकांना आठवड्यातून पाच दिवस दररोज ९० मिनिटांसाठी शुद्ध आॅक्सिजन देण्यात आले. हा प्रयोग तीन महिने चालला. याचा धक्कादायक निकाल आला. शास्त्रज्ञांनी असा दावा केला की, सर्व ३५ स्वयंसेवकांच्या वयावर लगाम लागले. वयाला उलटण्याचे हे सर्वोत्तम उदाहरण आहे.
जगभरातील शास्त्रज्ञ वय वाढवण्यासाठी जादूची गोळी शोधत आहेत. ती मिळेपर्यंत व्यायाम करा, आहारावर नियंत्रण ठेवा, धूम्रपान-तंबाखू-अल्कोहोलपासून दूर रहा, नियमित वैद्यकीय तपासणी आणि स्वच्छ हवेत राहा.