आरोग्य मंत्र्यांचे निर्देश वाऱ्यावर

By Admin | Published: March 3, 2015 01:36 AM2015-03-03T01:36:23+5:302015-03-03T01:36:23+5:30

स्वाईन फ्लूचा ससंर्ग वाढत असताना खुद्द सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशांचे पालन होत

Health Minister's directions on the wind | आरोग्य मंत्र्यांचे निर्देश वाऱ्यावर

आरोग्य मंत्र्यांचे निर्देश वाऱ्यावर

googlenewsNext

सोयींचा अभाव : स्वाईन फ्लू रुग्णांचा जीव टांगणीला
सुमेध वाघमारे ल्ल नागपूर

स्वाईन फ्लूचा ससंर्ग वाढत असताना खुद्द सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांच्या निर्देशांचे पालन होत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. सध्याच्या घडीला स्वाईन फ्लूचे ५९ बळी गेले असून २९६ रुग्णांची नोंद झाली आहे, परंतु सोयींच्या अभावी रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी खुद्द सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नागपुरात येऊन विविध विभागांची आढावा बैठक घेतली. यात, स्वाईन फ्लू नमुन्यांची तपासणी तत्काळ व्हावी, लवकर अहवाल मिळावा यासाठी पॉलिमर चेन रिअ‍ॅक्शन (पीसीआर) मशीन मेडिकलला उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. परंतु मेडिकलला या मशीनच्या खरेदीसाठी एकही रुपया मिळालेला नाही. विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभाग या मशीनसाठी दोन लाखांचा निधी मेडिकलला दिल्याचे सांगत आहे, परंतु हा निधी लहान मुलांमधील चांदीपुरा या आजाराच्या संशोधनासाठी आवश्यक असलेल्या कन्व्हेन्शनल पीसीआर मशीनसाठी मिळाल्याचे मेडिकल प्रशासनाचे म्हणणे आहे. या मशीनवर स्वाईन फ्लूचे नमुने तपासले जात नाही, असेही मेडिकलचे म्हणने आहे.
नमुने तपासणीचे शुल्क अर्ध्यावर आलेच नाही
राज्यात दोनच खासगी प्रयोगशाळांना स्वाईन फ्लूचे नमुने तपासणीची मान्यता आहे. यामुळे याचे शुल्क सर्वसामान्यांना परडवणारे नाही. हे शुल्क अर्ध्यावर आणण्यासाठी खासगी प्रयोगशाळांना मान्यता देण्यासाठी समिती नेमून तत्काळ निर्णय घेण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले होते, परंतु आतापर्यंत या सूचनांचे पालन झालेले नाही. यामुळे रुग्णांना पदरमोड करून पाच ते सहा हजार रुपयांत खासगीमधून तपासणी करावी लागत आहे.
४० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड स्वप्नवतच
एकट्या मेयो, मेडिकलवर वाढत्या रुग्णांचा भार लक्षात घेऊन महानगरपालिकेने स्वाईन फ्लूसाठी ४० खाटांचे आयसोलेशन वॉर्ड तयार करावे, असे निर्देश डॉ. सावंत यांनी महापौरांना दिले होते. परंतु पंधरा-वीस दिवसांचा कालावधी होऊनही या निर्देशांचेही पालन झालेले नाही. मेडिकलचा स्वाईन फ्लू वॉर्ड फुल्ल आहे. सध्याच्या घडीला ४७ रुग्ण उपचार घेत आहेत. मेयोसह खासगी रुग्णालयातही अशीच स्थिती आहे.
स्वाईन फ्लूचे ५३ नमुने प्रलंबित
मान्यताप्राप्त दोन खासगी प्रयोगशाळेत स्वाईन फ्लूचे नमुने तपासणीसाठी पाच ते सहा हजार रुपये शुल्क पडते. सर्वसामान्यांच्या हे अवाक्याबाहेर आहे. यामुळे दिवसेंदिवस मेयोच्या प्रयोगशाळेवर भार वाढत आहे. मेयोच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागही हे आवाहन स्वीकारत विशेष परिश्रम घेत आहे. पूर्वी १३ नमुने तपासले जात होते, आता २६ नमुने तपासण्यात येत आहे. असे असतानाही ५३ नमुने प्रलंबित आहेत. परिणामी, डॉक्टरांना रुग्णावरील उपचाराची दिशा ठरविण्यास अडचणीचे जात आहे.
शहरात २०५ रुग्ण
शहरात जानेवारी २०१५ ते आतापर्यंत २०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ग्रामीणमध्ये ३९, वर्धेत १४, भंडाऱ्यात चार, गडचिरोलीत एक तर इतर जिल्ह्यात १९, अकोला आरोग्य सेवा मंडळात सहा, मध्यप्रदेशातील २३ तर आंध्र प्रदेशातील एक असे ३१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Health Minister's directions on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.