‘हेल्दी बेबी कॅम्प’ं आज

By admin | Published: July 30, 2016 02:31 AM2016-07-30T02:31:18+5:302016-07-30T02:31:18+5:30

मुलांचा सर्वांगीण विकास, योग्य पालनपोषण, उत्तम आरोग्याप्रति जागरुकता आणण्याच्या उद्देशाने ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’च्यावतीने

'Healthy Baby Camp' today | ‘हेल्दी बेबी कॅम्प’ं आज

‘हेल्दी बेबी कॅम्प’ं आज

Next

‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ व ‘लोकमत’चा उपक्रम :
लहान मुलांच्या पालनपोषणाबद्दल करणार जनजागृती
नागपूर : मुलांचा सर्वांगीण विकास, योग्य पालनपोषण, उत्तम आरोग्याप्रति जागरुकता आणण्याच्या उद्देशाने ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’च्यावतीने शनिवार ३० जुलै रोजी दुपारी १२ वाजता भव्य ‘हेल्दी बेबी कॅम्प’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उत्तर अंबाझरी मार्गावरील कुसुमताई वानखेडे सभागृहात होणार आहे.
सुदृढ निरोगी बाळ प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते. स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने आपली संस्कृती विकसित होत जाते. यात मुलांच्या देखभालीची मोठी जबाबदारी जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ने घेतली आहे. यामुळेच भारतातील सर्वाधिक मातांचा हा लाडका ब्रॅण्ड बनला आहे. याच पद्धतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’. यांनी या दृष्टीने पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. १०० हून अधिक वर्षांसाठी ‘जॉन्सन बेबी’ हे बाळाच्या सुश्रुषा विज्ञानमध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अचूक विश्वास. म्हणूनच जॉन्सनची उत्पादने आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आली आहेत. यावर जगभरातील हजारो मातांचा विश्वास आहे. याच विश्वासावर तिचे बाळ घडत जाते. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा ‘कॅम्प’ एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न आहे. अशा प्रकारचे आयोजन सातत्याने केले गेले आहे.
मागील वर्षी सुद्धा अशा पद्धतीचे कार्यक्रम गोवा आणि महाराष्ट्रात राबविण्यात आले होते. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
या वर्षी पुन्हा एकदा ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या या शिबिरात जागरुक पालकांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या शिबिराला ‘इंडियन अकॅडमी आॅफ पेडियाट्रिक’चे (आयएपी) सहकार्य मिळाले आहे. (प्रतिनिधी)

हे बालरोग तज्ज्ञ देतील आपली सेवा
‘आयएपी’चे पालक डॉ. उदय बोधनकर, अध्यक्ष डॉ. सी.एम. बोकडे, सचिव डॉ. प्रवीण डहाके, डॉ. नीलोफर मुजावार, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. गिरीश चरडे, डॉ. कुलदीप सुखदेवे, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. चेतन शेंडे, डॉ. आशिष लोठे, डॉ. संदीप चौरसिया, डॉ. आशिष वैद्य, डॉ. शुभदा खिरवाडकर, डॉ. प्रवीण लाड, डॉ. निरंजन धारस्कर, डॉ. मिलिंद मंडलिक, डॉ. स्वाती वाघमारे, डॉ. संदीप मोगरे, डॉ. अनुज कडू, डॉ. ऋषिकेश बेलसरे, डॉ. आकाश बंग, डॉ. संजय देशमुख व डॉ. ऋषी लोडाया, डॉ. सृष्टी बालपांडे, डॉ. चेतन दीक्षित, डॉ. आनंद भुतडा, डॉ. विनीत वानखेडे, डॉ. दिनेश सारडा, विजय धोटे, डॉ. सुभाष ढवळे, डॉ. बालाजी पालेवार, डॉ. शिल्पा हजारे, डॉ. कुश झुनझुनवाला, डॉ. अनुप रडके, डॉ. विनोद गांधी, डॉ. वसंत खळतकर, डॉ. सूचित बागडे, डॉ. आर.जी. पाटील, डॉ. संजय मराठे, डॉ. संदीप यादव, डॉ. अनिल राऊत, डॉ. जयंत उपाध्ये, डॉ. जय शिवलकर, डॉ. अभिजित भारद्वाज.
४शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्यावतीने प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात येईल.
४पूर्ण कुटुंबासोबत ‘इन्स्टंट फोटो’ काढून बक्षिसाच्या स्वरूपात ती भेट केली जाईल. ज्यामुळे आयुष्यभर या आठवणी आपल्या सोबत राहतील.

 

Web Title: 'Healthy Baby Camp' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.