नाग नदीच्या पात्रात मातीचे ढिगारे, प्रवाह अडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:07 AM2021-06-17T04:07:23+5:302021-06-17T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पूर्व नागपुरातील प्रजापती नगरातून जाणाऱ्या नाग नदीच्या पात्रात महिनाभरापासून मातीचे ढिगारे उभे आहेत. यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पूर्व नागपुरातील प्रजापती नगरातून जाणाऱ्या नाग नदीच्या पात्रात महिनाभरापासून मातीचे ढिगारे उभे आहेत. यामुळे नदीचा प्रवाह प्रभावित झाला आहे. रेल्वे लाईनच्या विस्तारीकरणामुळे नदीच्या ६० टक्के भागात मातीचे ढिगारे उभारलेले आहेत. वेळीच लक्ष दिले नाही तर, मुसळधार पावसाने आलेल्या पुराचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका वाढला आहे. ढिगारे १० ते १५ फूट उंच आहेत. जोराचा पाऊस आला तर पाणी पात्रात साचून चंद्रनगर, भांडेवाडीसह परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांच्या जीवावर बेतू शकते.
हे कुण्या विभागाने किंवा व्यक्तीने केले असते तर आतापर्यंत गुन्हा दाखल झाला असता. मात्र दोन ते तीन महिन्यांपासून प्रवाह अडला असतानाही मनपा कारवाई करायला तयार नाही.
स्थानिक नागरिकांनी या संदर्भात तक्रार करूनही कुणी दखलही घेतली नाही. नगरसेवकांकडेही नागरिकांनी ही माहिती दिली. नदी स्वच्छता अभियानांतर्गत पात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहासाठी काही जागा सोडली असली तरी जोराच्या पावसाच्या दिवसात हे पुरेसे नाही. माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे म्हणाले, प्रवाह अडविल्याने स्थानिक नागरिक संकटात आहेत. रेल्वेने मान्सूनपूर्वीच काम पूर्ण करायला हवे होते. मुसळधार पाऊस आला तर अपुऱ्या कामामुळे आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे हा परिसर जलमय होऊ शकतो. ...
कोट
रेल्वे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यामुुळे चंद्रनगर जवळील नाग नदीच्या पात्रातील काही प्रवाह वळविला. प्रवाह अडला जाऊ नये यासाठी आवश्यक ते पाऊल उचलले जाईल. यासाठी रेल्वेला सूचना दिल्या जातील.
- मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता, मनपा
...