युग चांडक हत्याकांड खटल्याची सुनावणी २ रोजी
By Admin | Published: February 25, 2015 02:47 AM2015-02-25T02:47:01+5:302015-02-25T02:47:01+5:30
बचाव पक्षाच्या विनंतीवरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने युग चांडक अपहरण-हत्याकांडाची सुनावणी २ मार्चपर्यंत तहकूब केली आहे.
नागपूर : बचाव पक्षाच्या विनंतीवरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने युग चांडक अपहरण-हत्याकांडाची सुनावणी २ मार्चपर्यंत तहकूब केली आहे.
९ फेब्रुवारी रोजी पंच साक्षीदार हर्ष प्रकाशचंद्र फिरोदिया यांची उलटतपासणी साक्ष सुरू असताना आरोपी अरविंद सिंग यांच्यावतीने अॅड. मनमोहन उपाध्याय यांनी हा खटला थांबविला होता. आपणास योग्य न्याय मिळावा यासाठी आपणाविरुद्धचा खटला अन्य न्यायालयात स्थानांतरित करण्यात यावा. यासाठी आपण उच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असा अर्ज दाखल करून हा खटला थांबवण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे बचाव पक्षाचे वकील अॅड. उपाध्याय यांनी खटल्याच्या स्थानांतरणासाठी अद्याप उच्च न्यायालयात आधा अर्जही दाखल केलेला नाही. या खटल्याचे कामकाज सतत रेंगाळत आहे. आज मंगळवारी बचाव पक्षाचे वकील अॅड. उपाध्याय आणि अॅड. अग्रवाल यांच्या सहकारी वकिलांनी न्यायालयात अर्ज करून २ मार्चपर्यंत खटला तहकूब करण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य केली. (प्रतिनिधी)