गडकरी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर ६ ऑगस्टला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:06 AM2021-07-10T04:06:41+5:302021-07-10T04:06:41+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी ...

Hearing on petition against Gadkari on August 6 | गडकरी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर ६ ऑगस्टला सुनावणी

गडकरी यांच्याविरुद्धच्या याचिकेवर ६ ऑगस्टला सुनावणी

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी शुक्रवारी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर ६ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नाना पटोले यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या विनंतीवरून ही तारीख दिली.

२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी हे नागपूर मतदार संघातून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांनी निवडणूक कायद्यातील विविध तरतुदी व नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नागपूर मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे. पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके तर, गडकरी यांच्यावतीने ॲड. देवेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Hearing on petition against Gadkari on August 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.