भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीवर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:02+5:302021-07-30T04:08:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर, : नागपूर महापालिकेच्या मालकीच्या भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने भाडेपट्टाधारकांची सुनावणी घेण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

Hearing on tenant's complaint today | भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीवर आज सुनावणी

भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीवर आज सुनावणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर, : नागपूर महापालिकेच्या मालकीच्या भाडेपट्टाधारकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने भाडेपट्टाधारकांची सुनावणी घेण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीपुढे आज, शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

दिलेल्या मालमत्तांकरिता भाडेपट्टा नूतनीकरण, भाडेपट्टा हस्तांतरण ना-हरकत, बांधकाम ना-हरकत, भाडेपट्टा करारनाम्यातील अटी व शर्तींचा भंग झाल्यास करावयाच्या कार्यवाहीसंबंधी धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. त्यान्वये करण्यात येत असलेल्या कार्यवाहीसंबंधी भाडेपट्टाधारकांच्या असलेल्या तक्रारींवर सुनावणी घेण्याकरिता माजी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, वैशाली नारनवरे, नासुप्र विश्वस्त संजय बंगाले व महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिव्या धुरडे, आदी समितीचे सदस्य आहेत.

आक्षेप, तक्रारींची सुनावणी शुक्रवारी सकाळी ११ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. संबंधितांनी समिती समक्ष म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त (मालमत्ता) विजय देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Hearing on tenant's complaint today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.