हार्ट अटॅकचे प्रमाण १२५ टक्क्यांनी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:18 AM2017-09-27T01:18:23+5:302017-09-27T01:18:36+5:30

युवा वर्ग देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, अयोग्य जीवनशैली व वाढत्या व्यसनामुळे त्यांच्यात हृदयरोग बळावत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे.

Heart attack will increase by 125% | हार्ट अटॅकचे प्रमाण १२५ टक्क्यांनी वाढणार

हार्ट अटॅकचे प्रमाण १२५ टक्क्यांनी वाढणार

Next
ठळक मुद्देसुनील वाशीमकर : कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडियाचे पदग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवा वर्ग देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, अयोग्य जीवनशैली व वाढत्या व्यसनामुळे त्यांच्यात हृदयरोग बळावत चालला आहे, ही चिंतेची बाब आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५ पर्यंत तरुणांमध्ये हृदय विकाराचा झटका येण्याचे प्रमाण १२० ते १२५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे मत कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेचे नवे अध्यक्ष डॉ. सुनील वाशीमकर यांनी येथे व्यक्त केले.
कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी सकाळी रामदासपेठ येथील खासगी हॉटेलमध्ये थाटात पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायधीश सुनील शुक्रे, पद्मश्री डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कलारिक्कल, हृदयरोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे आदी उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले, देशात हृदयरोगाचे दोन कोटीवर रुग्ण आहेत. यात दरवर्षी ६० लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. धक्कादायक म्हणजे, अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदय विकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. यामुळे या आजाराविषयी व्यापक जनजागृती होऊन योग्य उपचार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
विदर्भात हृदय प्रत्यारोपणासाठी प्रयत्न
डॉ. वाशीमकर म्हणाले, मेंदू मृत व्यक्तीकडून फार कमी प्रमाणात अवयव दान होते. याला गती देण्यासाठी कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया व विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अवयव दानाच्या जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. सोबतच विदर्भात हृदय प्रत्यारोपणासाठी आवश्यक पायाभूत सोई उभ्या करण्यासाठी व शल्यचिकित्सक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.
अशी आहे नवी कार्यकारिणी
कार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेच्या नव्या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. सुनील वाशीमकर, सचिव डॉ. अनिल जवाहिरानी, आश्रयदाता डॉ. हरीशंकर भार्गव, निर्वाचित अध्यक्ष डॉ. अनुज सारडा, माजी अध्यक्ष डॉ. राम घोडेस्वार, सचिव डॉ. पंकज हरकूट, उपाध्यक्ष डॉ. निकुंज पवार, डॉ. काशीफ सय्यद, सहसचिव डॉ. विपुल सेता, डॉ. स्वप्निल देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. दीपक साने आदींचा सहभाग आहे. पदग्रहण सोहळ्याला डॉ. वाय. बन्सोड, डॉ. माधुरी होले, डॉ. पी.पी. जोशी, डॉ. मनीष श्रीगिरीवार आदी उपस्थित होते.

Web Title: Heart attack will increase by 125%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.