उष्म्याने होतो विजांचा कडकडाट
By admin | Published: June 17, 2015 02:54 AM2015-06-17T02:54:44+5:302015-06-17T02:54:44+5:30
पावसाळ्यात वीज म्हटले की कुणालाही धडकी भरते. तिचा कडकडाट होताच प्रत्येक जण स्तब्ध होतो. विजांच्या या
नागपूर : पावसाळ्यात वीज म्हटले की कुणालाही धडकी भरते. तिचा कडकडाट होताच प्रत्येक जण स्तब्ध होतो. विजांच्या या कडकडाटालाच शास्त्रीय भाषेत ‘थंडरस्टॉर्म’ म्हटल्या जाते. तज्ज्ञांच्या मते, विदर्भासह मध्य भारतात वातावरणीय अस्थिरता, अति उष्णता व आर्द्रता अधिक असल्याने येथे ‘थंडरस्टॉर्म’ची वारंवारता सर्वाधिक असते. शिवाय यामुळे उपराजधानीसह आसपासच्या परिसरात विजांचा अधिक कडकडाट होत असून, अनेकांच्या अंगावर ती पडून त्यात त्यांचा बळी जात आहे.
साधारणत: जून व जुलै महिन्यात ‘थंडरस्टॉर्म’ची वारंवारता सर्वाधिक असते. त्यामुळेच या दोन्ही महिन्यात विजांचा कडकडाट अधिक होतो. मात्र असे असले तरी विजांचा कडकडाट ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शिवाय वातावरणातील संतुलनासाठी ती अत्यावश्यक असल्याचे सांगितल्या जाते. अशाप्रकारे जगभरात एका वर्षात सुमारे ३ ते ६ हजार ‘थंडरस्टॉर्म’ सक्रिय होतात. पृथ्वी व वातावरणात पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा दोन प्रकारची ऊर्जा तयार होते. यातून विजेचा कडकडाट होतो. वातावरणातील निगेटिव्ह ऊर्जेचा पृथ्वीवरील पॉर्इंट कंडक्टरशी जेथे संबंध येतो, तेथे वीज पडण्याची अधिक संभावना असते. त्यामुळे अशा स्थळांना शास्त्रीय भाषेत ‘पॉर्इंट कंडक्टर’असे म्हटल्या जाते. वातावरणीय अस्थिरता, अधिक उष्णता व आर्द्रतेमुळे वातावरणात ‘थंडरस्टॉर्म’सह इलेक्ट्रिक फिल्ड तयार होते. नागपुरातील ‘थंडरस्टॉर्म’ची वारंवारता लक्षात घेता, जानेवारी महिन्यात १.३, फेब्रुवारी १.८, मार्चमध्ये २.६, एप्रिल ४.०, मे ६.४, जून १०.३, जुलै ९.०, आॅगस्ट ७.४, सप्टेंबर ८.२, आॅक्टोबर ३.२, नोव्हेंबर ०.७ व डिसेंबर महिन्यात ०.२ एवढी असते. यावरू न जून, जुलै व आॅगस्ट या तीन महिन्यात ‘थंडरस्टॉर्म’ची सर्वांधिक वारंवारता राहत असल्याने विजांचा कडकडाट अधिक होतो.
‘थंडर्सस्टॉर्म’ धोकादायक
विजांचा कडकडाट ही नैसर्गिक प्रक्रिया असून, ती वातावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक आहे. मात्र तेवढेच ते घातकही आहे. ‘थंडर्सस्टॉर्म’चे ढग साधारण जमिनीपासून १८ किलोमीटर उंच असतात. विमानासाठी ते अधिक धोकादायक असतात. त्यामुळे या ढगांमधून कधीही विमान जात नाही. तसेच एटीसीतर्फे पायलटला ‘थंडर्सस्टॉर्म’विषयी वेळोवेळी माहिती दिल्या जाते. पृथ्वीवर ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिल्ड तयार होते, तेथे वीज पडण्याची शक्यता असते. विशेषत: मान्सूनच्या सुरुवातीला अशाप्रकारच्या ‘थंडरस्टॉर्म’ ची वारंवारता अधिक राहत असल्याने विजांचा कडकडाट अधिक होतो.
- ए.व्ही. गोडे, सहा. हवामान तज्ज्ञ