एराेनाॅटिकल आयटीआयला भारी डिमांड; विमान कंपन्यात राेजगाराची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 07:55 PM2022-06-29T19:55:51+5:302022-06-29T19:58:29+5:30
Nagpur News फ्रान्सच्या डसाॅल्ट कंपनीच्या सहकार्याने शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू झालेल्या एराेनाॅटिकल स्ट्रक्चर ॲण्ड फिटर या ट्रेडला सध्या माेठी डिमांड आहे.
नागपूर : फ्रान्सच्या डसाॅल्ट कंपनीच्या सहकार्याने शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू झालेल्या एराेनाॅटिकल स्ट्रक्चर ॲण्ड फिटर या ट्रेडला सध्या माेठी डिमांड आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देशात पहिल्यांदा हा अभ्यासक्रम केवळ नागपुरात सुरू करण्यात आला आहे.
विमान कंपन्यामध्ये काैशल्यपूर्ण अभ्यासक्रमाची माेठी गरज आहे. नागपुरात सध्या टाटा एअराेस्पेस, बाेइंग, इंदमार, डसाॅल्ट-रिलायन्स यांची संयुक्त ड्राॅल कंपनी व एअर इंडियाचा एमआरओ या कंपन्या कार्यरत आहेत. त्यामुळे नागपूर हे एअराेस्पेस इंडस्ट्रीचे हब हाेत असल्याने एराेनाॅटिकलचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संत्रानगरीची निवड करण्यात आल्याचे शासकीय आयटीआयचे प्राचार्य प्रा. हेमंत आवारे यांनी सांगितले. अभ्यासक्रमाला पहिल्या वर्षीपासून माेठी मागणी असून अभियांत्रिकीचे विद्यार्थीही यामध्ये प्रवेश घेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवेशाचा कटऑफ ८५ टक्क्यावर असणे, हे याचे उदाहरण आहे.
हा दाेन वर्षाचा अभ्यासक्रम असून पहिल्या वर्षी २० व दुसऱ्या वर्षी ४० विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले जातात. विशेष म्हणजे फ्रान्सचे शिक्षक यामध्ये प्रशिक्षण देत असून डसाॅल्ट कंपनीद्वारे त्यांचे व्यवस्थापन केले जात आहे. देशभरात हा एकमेव अभ्यासक्रम असल्याने मागणी अधिक आहे. येथून प्रशिक्षण घेऊन निघालेल्या कुशल प्रशिक्षणार्थीला नागपूरसह हैदराबाद, बंगरूळूसह हिंदूस्थान एराेनाॅटिक्स, इंडियन एअरफाेर्स अशा संस्थांमध्ये चांगली संधी आहे. शिवाय ऑटाेमाेबाईल, कार मॅन्यूफॅक्चरिंग कंपन्यांमध्येही या प्रशिक्षणार्थींना संधी असल्याचे प्राचार्य आवारे यांनी सांगितले.
सर्व ट्रेडसाठी माेठी मागणी
लवकर राेजगार मिळविण्याची संधी असल्याने आयटीआयच्या सर्वच ट्रेडला माेठी मागणी आहे. प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि माेठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले असल्याचे प्राचार्य आवारे यांनी सांगितले. शहरात तीन शासकीय आयटीआय आहेत व त्यामध्ये २८ ट्रेडचे प्रशिक्षण मिळत असून १५५२ जागा आहेत. सध्या काैशल्याभिमुख प्रशिक्षणाला उद्याेग क्षेत्रात माेठी मागणी आहे. आयटीआयचे प्रशिक्षण प्रात्यक्षिकावर आधारित असल्याने आयटीआय प्रशिक्षणार्थिंना माेठी मागणी आहे.
मुलींसाठी विशेष सवलती
आयटीआयमध्ये मुलींचे प्रमाण वाढावे म्हणून वेगवेगळ्या सवलती त्यांना देण्यात येत आहेत. स्ट्राईव्ह याेजनेअंतर्त माेफत प्रवास सेवा, निर्वाह भत्ता तसेच एससी/एसटी, आदिवासी विद्यार्थिनींना आरक्षणाचा फायदा. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये काैशल्यपूर्ण मुलींना चांगली मागणी असल्याचे प्रा. हेमंत आवारे यांनी सांगितले. मुलींनी प्रशिक्षणासाठी यावे, असे आवाहन त्यांनी केले.