रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 02:48 PM2023-03-19T14:48:18+5:302023-03-19T14:48:44+5:30
सावरगाव, प्रतिनिधी नागपूर जिल्ह्यामध्ये 19/3/23 ला दुपारी 11.45 ला पावसासह गारपिटीचा तडाखा बसला, यावेळी पावसासह गारपिटही झाल्याने गहू,हरभरा, आंबा, ...
सावरगाव, प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यामध्ये 19/3/23 ला दुपारी 11.45 ला पावसासह गारपिटीचा तडाखा बसला, यावेळी पावसासह गारपिटही झाल्याने गहू,हरभरा, आंबा, संत्रा व अन्य रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल तालुक्यांमध्ये सोनोली,मेंडकी,गोंधनी, तपनी,झिल्पा, इसापूर, सावरगाव, या भागात पावसासह गारपिट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले, वातावरण बदलामुळे गारवा निर्माण झाला आहे, शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणात केला आहे, परंतु गारपीट व पावसामुळे गहू हरभरा आंबा संत्रा व अन्य रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे, अश्या वेळी शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे व विमा कंपन्यांनी पिक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर द्यावा,व मोका चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे