नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी : हजारो कुटुंब बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 09:47 PM2018-07-07T21:47:11+5:302018-07-07T21:50:15+5:30
विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.
विभागात मागील २४ तासात जिल्हानिहाय झालेल्या पावसामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी १३२.६१, वर्धा ६१.०५, भंडारा ३३.३७, चंद्रपूर ९२.२७, गोंदिया १९.२७ तर गडचिरोली जिल्ह्यात २१.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात १० तालुक्यात ६५ मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, यामध्ये हिंगणा तालुक्यात २७२.७०, सावनेर ११६.४०, रामटेक १७०.४०, पारशिवनी १९३, मौदा ९०, उमरेड १३१.४०, कुही १००.६०, कामठी ८४.८०, कळमेश्वर ६२ तर काटोल १८.२०, नरखेड ३२, भिवापूर १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यातील १५ गावांतील ३ हजार ४५० कुटुंब बाधित झाले असून, ९४५ बाधित घरांचा समावेश आहे. काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे ४८० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये तुरकमारी, वडगाव, विरुळ, इरमिती, रायपूर, टाकळघाट, सुपरीबेला आदी गावांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये बाधित कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.
नागपूर ग्रामीणमधील पुरामुळे २० गावे बाधित झाली असून, २८४ बाधित कुटुंबे आहेत. तसेच २८४ घरे बाधित झाले असून, ३९ कुटुंबांना