Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले

By आनंद डेकाटे | Published: September 23, 2023 01:57 PM2023-09-23T13:57:40+5:302023-09-23T13:58:11+5:30

अंबाझरी, गोरेवाडा ओव्हर फ्लो, पाणी साचून चौक ‘ब्लॉक; गाड्या रस्त्यांवर तरंगल्या, वाहतूक पूर्णपणे ठप्प

Heavy Rain in Nagpur; Rescue team rescued 349 people safely | Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले

Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले

googlenewsNext

नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूरची दाणादाण उडाली आहे. एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. विविध बचाव पथकांनी राबविलेल्या मोहिमे एकूण ३४९ लोकाना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

अंबाझरी तलाव, नाग नदी, पिवळी नदी आणि स्थानिक नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातील अनेक भागात विशेषत: अंबाझरी तलाव, नाग नदीजवळील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. धरमपेठ, शंकर नगर, अंबाझरी एनआयटी, झाशी राणी चौक, पंचशील चौक, कांचीपुरा, कॉटन मार्केट, लकडधंज आदी भागात पाणी शिरले आणि घरांमध्ये पाणी शिरले. एनएमसी अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि आपदा मित्र पथके अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी तैनात करण्यात आली होती.

- बचाव कार्य

- मनपा अग्निशमन दल : १५२ व्यक्ती
- एसडीआरएफ टीम : १०५ व्यक्ती
- एनडीआरएफ टीम : ४५ व्यक्ती
- भारतीय सैन्य दल : ३६ व्यक्ती
- आपदा मित्र टीम : ११ व्यक्ती

Web Title: Heavy Rain in Nagpur; Rescue team rescued 349 people safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.