विदर्भात अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 08:17 PM2020-03-29T20:17:50+5:302020-03-29T20:19:27+5:30
गेल्या आठवड्यापासून पाठीमागे लागलेल्या अवकाळी पावसाने रविवारी पुन्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. नागपूर, गोंदिया, यवतमाळ वर्धा जिल्ह्यांत कडकडाटी वादळवाऱ्यासह संध्याकाळी पावसासह गारांचाही वर्षाव झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या आठवड्यापासून पाठीमागे लागलेल्या अवकाळी पावसाने रविवारी पुन्हा विदर्भातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. नागपूर, गोंदिया, यवतमाळ वर्धा जिल्ह्यांत कडकडाटी वादळवाऱ्यासह संध्याकाळी पावसासह गारांचाही वर्षाव झाला.
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील परसवाडा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला. याचसोबत भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. सर्वत्र कोरोनाचा संसर्ग असल्याने लॉकडाऊनची स्थिती आहे. तशात पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
वर्धा जिल्ह्यातील पोहणा, केळझर, पवनार, सिंदी रेल्वे, आर्वी येथे मुसळधार पाऊस झाला तर कारंजा व आष्टी येथे गारांचा वर्षाव झाला. या गारपिटीने गहू व हरभरा पिकांचे मोठे नुकसान केले आहे. यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव, नेर व बाभूळगाव येथेही पाऊस कोसळला. या भागातील विद्युत पुरवठा बराच काळ खंडित झाला होता.
नागपुरातही संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. शहराच्या काही भागातील विद्युत पुरवठा काही काळाकरिता खंडित झाला होता.