मुसळधार पावसाचा फटका : एक विमान रद्द, मुंबईतून येणाऱ्या विमानाला चार तास विलंब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 08:12 PM2019-07-02T20:12:23+5:302019-07-03T00:24:30+5:30

मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नागपुरात येणारी एकूण सहा विमाने दुपारी १.३० पर्यंत उशिरा पोहोचली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.

Heavy rains affected: One aircraft canceled, the flight from Mumbai is delayed by four hours | मुसळधार पावसाचा फटका : एक विमान रद्द, मुंबईतून येणाऱ्या विमानाला चार तास विलंब 

मुसळधार पावसाचा फटका : एक विमान रद्द, मुंबईतून येणाऱ्या विमानाला चार तास विलंब 

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईत एक धावपट्टी बंद 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुसळधार पावसामुळे मुंबईहून नागपुरात सकाळी येणाऱ्या तीन विमानांना विलंब झाला. तर एअर इंडियाचे सकाळी ७.२० वाजता नागपुरात येणारे एआय ६२६ मुंंबई-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गो एअरचे विमान तब्बल चार तास उशिरा नागपुरात पोहोचले. देशाच्या अन्य भागातून नागपुरात येणारी एकूण सहा विमाने दुपारी १.३० पर्यंत उशिरा पोहोचली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. 


प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी मुंबईत स्पाईस जेट कंपनीचे विमान धावपट्टीवरून घसरल्यामुळे या धावपट्टीवरील वाहतूक दुपारी २ पर्यंत बंद करण्यात आली होती. त्यामुळे कोणतेही विमान उतरले नाही. दुसऱ्या धावपट्टीवरून केवळ विमानांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे सकाळी ७.३० पर्यंत ३७ विमाने इतरत्र वळविण्यात आली.
याशिवाय सोमवारी रात्री २.१० वाजता पुणे येथून नागपुरात येणारे इंडिगोचे ६ई २८९४ हे विमान १.४३ तास उशिरा अर्थात ३.५५ वाजता आले. तसेच एअर अरेबियाचे जी९ ४१६ शारजाह-नागपूर विमान २६ मिनिटे उशिरा पहाटे ४.१० ऐवजी ४.३० वाजता, गो एअरचे जी८ २६०१ मुंबई-नागपूर विमान सकाळी ८.१५ ऐवजी दुपारी १२.२० वाजता म्हणजेच तब्बल ४ तास ५ मिनिटांनी उशिरा आले. तसेच नागपुरात येणाऱ्या विमानांमध्ये इंडिगोचे ६ई २०१७ दिल्ली-नागपूर विमान १७ मिनिटे उशिराने, इंडिगोचे ६ई ४८२ मुंबई-नागपूर विमान सकाळी ९.५५ ऐवजी ३.२० तास उशिरा दुपारी १.१५ वाजता पोहोचले. याशिवाय इंडिगोच्या मुंबई-नागपूर ६ई ५३८८ विमान दुपारी १.२५ ऐवजी २.१० मिनिटे उशिराने आले. तर नागपुरातून मुंबईला जाणारे गो एअरचे जी८ २६०२ विमान २.१० तास उशिरा दुपारी १२.५८ ऐवजी २.२४ वाजता पोहोचले.

नागपूर धावपट्टीचे लाईट शॉटसर्किटने बंद  : दुबई-मुंबई विमान नागपुरात उतरले         

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे लाईट शॉर्ट सर्किटमुळे चार तास बंद असल्यामुळे नागपुरात येणारी काही विमाने हैदराबादला वळविण्यात आली. 
मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाची एक धावपट्टी दुपारी २ पर्यंत बंद करण्यात आल्यामुळे मुंबईची काही विमाने नागपुरात वळविण्यात आली. चार विमाने रद्द करण्यात आली आणि काही विलंबाने नागपुरात पोहोचली. कतार एअरवेजचे क्यूआर-५९० दोहा-नाागपूर विमान हैदराबादला वळविण्यात आले. यामुळे क्यूआर ५९१ नागपूर-दोहा विमान (मंगळवारी सकाळी ३.४० वाजता) रद्द करण्यात आले. मुंबईत मुसळधार पावसामुळे ६ई ०६२ दुबई-मुंबई विमान नागपुरात वळविण्यात आले. नागपुरशी सबंधित पाच उड्डाने रद्द करण्यात आली तर एकूण सहा विमाने वळवून नागपुरात उतरविण्यात आली. 
नागपूर विमानतळाच्या धावपट्टीवरील लाईट पहाटे ४ वाजता सुरळीत करण्यात आले, पण त्यापूर्वीच धावपट्टीवर अंधार असल्यामुळे इतरत्र वळविण्यात आली. 

Web Title: Heavy rains affected: One aircraft canceled, the flight from Mumbai is delayed by four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.