मुसळधार पावसाचा कळमेश्वर तालुक्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:27+5:302021-07-24T04:07:27+5:30

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरात ...

Heavy rains hit Kalmeshwar taluka | मुसळधार पावसाचा कळमेश्वर तालुक्याला फटका

मुसळधार पावसाचा कळमेश्वर तालुक्याला फटका

googlenewsNext

कळमेश्वर : कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले तर शेतात काम करणारे मजूर, शेतकरी, जनावरे अडकून पडली होती. तसेच काही मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. यामुळे पुन्हा पुलांची उंची वाढविण्याची मागणी पुढे आली आहे.

कळमेश्वर तालुक्यात गुरुवारी ११०.४० मिलिमीटर पाऊस पडला. यात नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. यामुळे कमी उंचीच्या पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने तालुक्यातील वाहतूक प्रभावित झाली होती. कळमेश्वर-गोवरी मार्गावरील पूल, झुनकी गावाजवळील पूल, सावंगी जवळी पूल, गोंडखैरी गावातील पूल आदी पुलावरून पाणी वाहत असल्याने नागरिकांना घरी जाण्यासाठी पूर ओसरण्याची वाट पहावी लागली.

तालुक्यातील तेलगाव येथे पावसापासून बचाव करण्यासाठी रामराव कैकाडे (५०) व कृपाकर हिवरकर (३५) यांनी ऑटोचा सहारा घेतला होता. परंतु वादळी वाऱ्याने झाड ऑटोवर कोसळल्याने ते दोघे जखमी झाले. तसेच झुनकी जवळील पुलावरील काँक्रीट वाहून गेल्यामुळे पुलाच्या पायल्या उघड्या पडल्या आहेत. या पुलावरून बैलबंडी, दुचाकी-चारचाकी कशी न्यावी असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेती मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना या पुलावरून वाहतूक करण्याशिवाय पर्याय नाही. परंतु पूलच उखडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर वाहतुकीचा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. सोबतच नदी नाल्याच्या काठावरील शेतजमीन पुरामुळे खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कळमेश्वर- काटोल मार्गावरील खडक नदीजवळ चौदा मैल - सावनेर मार्गावरील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याकरिता नदीवरील पुलावरुन वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतुकीकरिता पुलाच्या बाजूला तात्पुरता मुरुम गिट्टी टाकून पूल बनविण्यात आला. परंतु गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसाने नदीनाले दुथडी भरुन वाहत असून या पुलाखालुन पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी पुरेपूर व्यवस्था केली नसल्याने येथे पाणी वाहत होते. काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.

Web Title: Heavy rains hit Kalmeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.