नागपुरात दमदार पाऊस, दुपारी २९ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:13 AM2021-09-08T04:13:01+5:302021-09-08T04:13:01+5:30
नागपूर : मागील २४ तासात नागपुरात दमदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारपर्यंत झालेल्या पावसाची नोंद २९ मिमी झाली असून मागील ...
नागपूर : मागील २४ तासात नागपुरात दमदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारपर्यंत झालेल्या पावसाची नोंद २९ मिमी झाली असून मागील २४ तासात सकाळी ८.३० वाजेपर्यत नागपुरात ६२.२ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.
सोमवारच्या रात्रीपासूनच शहरात पाऊस सुरू झाला. रात्री २ वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सुमारे पाऊणा तास पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मंगळवारी सकाळपासूनच आकाश काळवंडलेले होते. सकाळी ८.३० वाजतानंतर पुन्हा दमदार पाऊस आला. थोडी उसंत घेत दुपारी १.३० वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता.
पावसाळी वातावरणामुळे शहरातील दिवसाचे कमाल तापमान २९.२ अंश सेल्सिअसवर आले आहे. सकाळी आर्द्रता १०० टक्के नोंदविण्यात आली, तर सायंकाळी ८५ टक्के नोंदली गेली. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.