वादळी पावसाचा तडाखा, वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:22+5:302021-05-19T04:09:22+5:30

नागपूर : मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळ-वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागांत अंधार पसरला हाेता. ...

Heavy rains, power outages | वादळी पावसाचा तडाखा, वीजपुरवठा खंडित

वादळी पावसाचा तडाखा, वीजपुरवठा खंडित

Next

नागपूर : मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळ-वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक भागांत अंधार पसरला हाेता. बुट्टीबाेरीमध्ये विद्युत तारेवर झाड पडल्याने, या भागातही वीज खंडित झाली हाेती.

बुट्टीबाेरीत आज वादळासह पाऊस पडला. या दरम्यान, एसकेजी व मेन राेडजवळ दाेन झाडे विद्युत तारेवर पडले. अनेक विजेचे खांब वाकडे झाले, तर काही पडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला हाेता. सुतगिरणी फीडर पूर्णपणे ठप्प पडला हाेता. जवळपास ४,००० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला हाेता. क्रेनच्या मदतीने तारांवरील झाडे हटविल्यानंतरच वीजपुरवठा सुरळीत हाेऊ शकला. बेला फीडरअंतर्गत झाडे पडल्याने दाेनपेक्षा अधिक खांब वाकलेले हाेते. त्यामुळे अनेक भागांत अंधार पसरला हाेता. महावितरणचे कर्मचारी दुरुस्तीच्या कामात लागले हाेते. कंपनीतर्फे झालेल्या नुकसानीचे आकलन करीत हाेते.

नागपूर शहरातही बदलत्या हवामानामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम झाला हाेता. रामबाग फीडरवर झाडे पडल्याने, त्याच्याशी जुळलेले वंजारीनगर, रामबाग व जाटतराेडी परिसरात वीजपुरवठा खंडित हाेऊन अनेक तास अंधार पसरला हाेता. याप्रमाणे, वाडी परिसरात बराच वेळ वीज बंद पडली हाेती. हिंगणा, नारासह गांधीबाग डिव्हिजनच्या काही वस्त्यांमध्ये वीजपुरवठा प्रभावित झाला हाेता. पाऊस पडल्याने उमस वाढली व वीज नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ब्रेकडाउन दुरुस्ती करताना कर्मचाऱ्याचा मृत्यू

डिपीएस स्कूल, मिहानजवळ ब्रेकडाउन दुरुस्तीचे काम करीत असलेल्या एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ४५ वर्षीय प्रशांत भलावी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ केव्ही मिहान ३ फिडरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे परिसरात अंधार पसरला हाेता. हा बिघाड दूर करण्यासाठी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान प्रशांत विद्युत खांबावर चढले हाेते. यावेळी हा अपघात घडला. आरटीपीसीआर टेस्टनंतर बुधवारी पाेस्टमार्टम करण्यात येईल.

Web Title: Heavy rains, power outages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.