ब्रिटिशकालीन पुलावरील जड वाहतूक धाेकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:11 AM2021-08-29T04:11:35+5:302021-08-29T04:11:35+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : शहरालगत वाहणाऱ्या कन्हान नदीवरील १४७ वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल माेडकळीस आला असला तरी त्यावरून जड ...

Heavy traffic on British-era bridges is frightening | ब्रिटिशकालीन पुलावरील जड वाहतूक धाेकादायक

ब्रिटिशकालीन पुलावरील जड वाहतूक धाेकादायक

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : शहरालगत वाहणाऱ्या कन्हान नदीवरील १४७ वर्षापूर्वीचा ब्रिटिशकालीन पूल माेडकळीस आला असला तरी त्यावरून जड व ओव्हरलाेड वाहनांची रहदारी सुरूच आहे. या जड वाहतुकीमुळे भविष्यात माेठी जीवितहानी हाेण्याची शक्यता असल्याने ही वाहतूक कायम बंद करण्याची मागणी केली जात आहे.

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेला हा पूल महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दाेन राज्यांना जाेडणारा आहे. ब्रिटिशांनी या पुलाची निर्मिती सन १८७४ मध्ये केली असून, १४७ वर्षे वय असलेल्या या पुलाचे आयुष्यही संपत आले आहे. हा पूल माेडकळीस आला असला तरी त्यावरून जड व ओव्हरलाेड वाहनांची २४ तास रहदारी सुरूच असते. या पुलाच्या काॅलमचे सिमेंटचे पापुद्रे व सळाकी उघड्या पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या पुलावरून जड वाहतूक धाेकादायक ठरण्याची शक्यता बळावली आहे.

संभाव्य धाेका टाळण्यासाठी भारतीय जनता युवा माेर्चाच्या कन्हान शहरातील कार्यकर्त्यांनी ठाणेदार विलास काळे यांना निवेदन देऊन ही जड वाहतूक बंद करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळात शैलेश शेळकी, रिंकेश चवरे, संजय रंगारी, मयूर माटे, सचिन वासनिक, वृषभ बावणकर, अमन घोडेस्वार यांचा समावेश हाेता.

...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली

या पुलाचे आयुष्य व सध्याची अवस्था लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वीच या पुलावरून जड वाहतूक कायमची बंद करावी, असे आदेश दिले हाेते. त्याअनुषंगाने पुलाच्या बाजूला तशा आशयाचा फलकही लावण्यात आला आहे. मात्र, या आदेशाची पायमल्ली केली जात असताना पाेलीस व बांधकाम विभागातील अधिकारी काहीही कारवाई करायला तयार नाहीत.

Web Title: Heavy traffic on British-era bridges is frightening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.