नकली पोलिसांचा हैदोस

By admin | Published: March 14, 2016 03:03 AM2016-03-14T03:03:40+5:302016-03-14T03:03:40+5:30

स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या नकली पोलिसांनी शहरात हैदोस घातला आहे.

Hedos of fake police | नकली पोलिसांचा हैदोस

नकली पोलिसांचा हैदोस

Next

पुन्हा चौघांना लुटले : नागरिक त्रस्त
नागपूर : स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून लोकांना लुटणाऱ्या नकली पोलिसांनी शहरात हैदोस घातला आहे. शनिवारी एका वृद्ध महिलेला लुटल्यानंतर पुन्हा तिघांना लुटण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
बजरंगनगर येथील ७५ वर्षीय विठ्ठलराव हिंगणे हे शनिवारी सायंकाळी ५ वाजता पायी फिरत असतांना ३५ ते ४० वर्ष वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्याजवळ आली आणि सिद्धेश्वर हॉलजवळ काही गुंडांना पकडले आहे. तुमच्या हातातील अंगठी व चेन काढून रुमालमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यांनी तसे करताच ती रुमाल स्वत: बांधला व त्यांच्या हातात देऊन घरी गेल्यावरच रुमाल उघडण्यास सांगितले. हिंगणे यांनी घरी आल्यावर रुमाल उघडला तेव्हा रुमालमध्ये दागिने नव्हते.
दुसरी घटना जयताळा येथे घडली. गव्हर्नमेंट प्रेस सोसायटी जयताळा येथील ५२ वर्षीय चंद्रशेखर वासनिक हे शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता जयताळा येथे पायी जात असतांना दोन व्यक्ती मोटारसायकलवर त्यांच्याकडे आल्या आणि पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या हातातील सोन्याची चेन, अंगठी काढून रुमालमध्ये ठेवण्यास सांगितले. एकाने रुमाल बांधला व दुसऱ्याने तो रुमाल त्याच्या खिशात ठेवला व पळून गेले. वासनिक यांनी रुमाल उघडून पाहिला तेव्हा त्यात दागिने नव्हते.
त्याचप्रकारे शिर्डी नगर मानेवाडा येथील ७० वर्षीय टोंगसे हे रविवारी सकाळी ७.१५ वाजता मानेवाडा सिमेंट रोडने पायी फिरत असतांना ३० ते ३५ वयोगटातील दोन युवक त्यांच्याजवळ आले.
त्यांनी स्वत:ला पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या हातातील अंगठी व चेन रुमालमध्ये बांधून खिशात ठेवण्यास सांगितले. त्यांची नजर चुकवून दागिने लंपास केले. त्याचप्रकारे थोड्या दूर अंतरावर ७० वर्षीय प्रभाकर रननवरे यांनाही तसेच फसवण्यात आले.
या घटनांमुळे वृद्धांमध्ये दहशत पसरली असून पोलीसही हादरले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hedos of fake police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.