नागपूर मेट्रो एअरपोर्ट स्टेशनची उंची ९० फूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:10 PM2018-08-03T22:10:05+5:302018-08-03T22:11:52+5:30
अर्बन आर्किटेक्चरवर आधारित महामेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९० फूट राहणार आहे. नागपुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्बन आर्किटेक्चरवर आधारित महामेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९० फूट राहणार आहे. नागपुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
स्टेशनवरील मोकळ्या जागेत सुरक्षेसंदर्भात सर्व उपकरणे हाताळली जात आहे. एअरपोर्ट स्टेशनवरील प्लॅटफॉर्म ७७.५ मीटर लांबीचा राहील. प्री-इंजिनिअरिंग बिल्डिंग (पीईबी) म्हणजे धातूंच्या साह्याने कारखान्यात तयार केलेल्या स्ट्रक्चरला कार्यस्थळावर नेऊन उभारणी करण्याचे काम होय. मेट्रोच्या साऊथ एअरपोर्ट ते एअरपोर्ट स्टेशनपर्यंत असणाऱ्या एलिव्हेटेड सेक्शनवर तयार झालेल्या मेट्रो रुळाचे (ट्रॅक) परीक्षण बुलंद इंजिनच्या साहाय्याने महामेट्रो अधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
एअरपोर्ट स्टेशनलगत ‘पीईबी’ संरचनेचे काम सुरू असून त्याच्या बांधकामात धातू आणि इतर साहित्याचा वापर करण्यात आला आहे. फॅक्टरीत तयार झालेले प्री-कास्ट स्ट्रक्चर एअरपोर्ट स्टेशनवर आणून बसविले जाणार आहे. आकर्षक पांढºया रंगाच्या ‘पीईबी’ उभारणीकरिता विविध प्रकारच्या जड आणि हलक्या साहित्यांचा वापर होणार आहे. कॉलम आणि बीमचे कार्य पूर्ण झाल्यानंतर कॉन्क्रिटपासून स्टेशनची उंची १६.७८ मीटर असेल. एकूण २१०८ चौरस मीटर जागेवर ‘पीईबी’ उभारल्या जात आहे.
एअरपोर्ट स्टेशनवरील कार्य पूर्ण करीत असताना विविध साहित्यांचे कटिंग, आकार देणे, एकत्र करणे आणि वेल्डिंगसारखी कामे करण्यात येत आहेत. ही सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे आवश्यक त्या नवीनतम तंत्रज्ञानाचा उपयोग करून पूर्ण केली जात आहेत. त्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अनुभवी अधिकारी आणि कर्मचाºयांची चमू संपूर्ण कार्य करीत आहे. ‘पीईबी’ स्टेशनची संपूर्ण रचना आधुनिक संरचनेवर आधारित आहे. त्यात विशेषरीत्या डिझाईन केलेल्या बोल्टचा उपयोग होत आहे. आधुनिक शैलीने स्टेशनचे बांधकाम होत असल्याने एकूण खर्चात ४० टक्के कपात होत आहे. तसेच पारंपरिक बांधकामात विटा, लाकूड, रेती व ग्लेझिंगचा वापर करण्यात येत आहे.