महामार्गावर हेलिपॅड, जखमींचा वाचणार जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:43+5:302021-09-05T04:12:43+5:30

नागपूर : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळाले तर त्यांचे जीव वाचण्याची शक्यता अधिक वाढते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर ...

Helipad on the highway, the injured will survive! | महामार्गावर हेलिपॅड, जखमींचा वाचणार जीव!

महामार्गावर हेलिपॅड, जखमींचा वाचणार जीव!

Next

नागपूर : रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळाले तर त्यांचे जीव वाचण्याची शक्यता अधिक वाढते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅडची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

‘विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्रा’च्या वतीने (झेडटीसीसी) शनिवारी वनामती येथील सभागृहात आयोजित ‘मेकिंग रोडस् फॉर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन’ कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर वनामतीच्या संचालक डॉ. माधवी खोडे, ‘झेडटीसीसी’च्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. संजय कोलते, ‘आयएमए’ अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, रोटरीच्या डॉ. जेरस्टीन वॉचमेकर आदी उपस्थित होते. ‘ब्रेनडेड’ झालेल्या आपल्या माणसाच्या अवयवदानासाठी पुढाकार घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या कुटुंबीयांचा व अवयवदानाची जनजागृती करणाऱ्या पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. दाणी यांनी केले. संचालन शुभदा फडणीस व वीणा वाठोरे यांनी, तर आभार डॉ. कोलते यांनी मानले.

- वाहन परवाना अर्जावरही अवयवदानाची माहिती

मोटार वाहन परवानाच्या अर्जावर उमेदवार अवयवदानासाठी इच्छुक आहे किंवा नाही, याची माहिती भरून घेतली जात आहे. अवयवदानाचा व्यापक जनजागृतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही मत गडकरी यांनी व्यक्त केले.

- शासकीय रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण व्हावे

शासकीय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना परडवेल या किमतीत अवयव प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न आहे. आपला माणूस गमावल्याच्या त्या दु:खातही अवयवदानाचा निर्णय घेणाऱ्या कुटुंबीयांचा अभिमान वाटतो, असे विचारही गडकरी यांनी मांडले.

- ‘लोकमत’चे सुमेध वाघमारे यांचा सत्कार

अवयवदानाच्या चळवळीचे महत्त्व जनसामान्यांना पटवून देण्यासाठी ‘लोकमत’च्या माध्यमातून वेळोवेळी बातम्या प्रकाशित करून आपले सामाजिक दायित्व पार पाडणारे ‘लोकमत’चे उप मुख्य उपसंपादक सुमेध वाघमारे यांचा सत्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ‘लोकमत’च्या या सामाजिक भानाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुकही केले.

Web Title: Helipad on the highway, the injured will survive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.