अवयवदानासाठी महामार्गावर हेलिपॅड : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:59 PM2018-12-08T20:59:27+5:302018-12-08T22:06:56+5:30

रस्ता अपघाताचे प्रमाण गेल्या वर्षी ५ टक्क्याने कमी झाले. रस्ता सुरक्षाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने हे प्रमाण आणखी कमी होईल. परंतु त्यातुलनेत होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत म्हणून महामार्गावर ‘हेलिपॅड’चा प्रस्ताव आहे. यात ‘ब्रेन डेड’ रुग्ण राहिल्यास अवयवदानासाठीही मदत होऊ शकेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

Helipad on the highway for organ donation: Nitin Gadkari | अवयवदानासाठी महामार्गावर हेलिपॅड : नितीन गडकरी

अवयवदानासाठी महामार्गावर हेलिपॅड : नितीन गडकरी

Next
ठळक मुद्देमाय मेडिकल मंत्राच्यावतीने अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ता अपघाताचे प्रमाण गेल्या वर्षी ५ टक्क्याने कमी झाले. रस्ता सुरक्षाकडे विशेष लक्ष दिले जात असल्याने हे प्रमाण आणखी कमी होईल. परंतु त्यातुलनेत होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत म्हणून महामार्गावर ‘हेलिपॅड’चा प्रस्ताव आहे. यात ‘ब्रेन डेड’ रुग्ण राहिल्यास अवयवदानासाठीही मदत होऊ शकेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.
‘माय मेडिकल मंत्रा’च्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्यानिमित्तान शनिवारी अवयवदात्याच्या कुटुंबाचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. गडकरी यांच्या बंगल्यावर झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, महामार्गावरील ‘हेलिपॅड’साठी टाटा ट्रस्ट व जर्मनीच्या एका कंपनीने मदत करण्यास पुढाकारही घेतला आहे. वाहन परवाना यावर असलेल्या ‘चीप’वरही आता अवयवदानासाठी इच्छुक असणाऱ्या वाहनचालकांची नोंद असणार आहे. यामुळे अघटित घटना घडल्यास अवयवदानासाठी त्याची मदत होऊ शकेल. असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत आपल्या माणसाचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय अनेक कुटुंब घेत आहेत. त्यांच्या या संयम आणि मानवतावादी भूमिकेमुळेचे अवयवदानाचा टक्का वाढत आहे, असेही ते म्हणाले. 


यावेळी ‘माय मेडिकल मंत्रा’च्या वर्धापन दिनानिमित्त नितीन गडकरी यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच अवयवदानात उल्लेखनीय कार्य करणारे बॉम्बे हॉस्पिटलच्या नेफ्रालॉजी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीरंग बिच्छू, ‘झोनल ट्रान्सप्लान्ट को-आॅर्डिनेशन सेंटर’च्या (झेडटीसीसी) अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे, झेडटीसीसीच्या कॉर्डिनेटर वीणा वाठोरे, डॉ. हेमंत भालेकर व डॉ. ऋषी अंधारकर यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर अवयवदात्यांच्या कुटुंबीयांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक ‘माय मेडिकल मंत्रा’चे वरिष्ठ संपादक संतोष आंधळे यांनी केले. संचालन सहायक संपादक मयंक भागवत यांनी केले.

या ‘रिअल हिरों’चा सत्कार

आप्त गेल्याच्या दु:खातही दुसऱ्यांच्या जीवाचा विचार करून अवयवदानाचा निर्णय घेणारे ‘रिअल हिरो’ सिमरन राजकुमार खिलनानी, स्वप्निल सुभाष पुरी, रोझीना राणा, राधेश्याम रहागंडाले, मनीषा पशीने, लक्ष्मी गुप्ता, चिंतनवाला व मनोहर दुधपचारे यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अवयवरूपी जिवंत असल्याचे समाधान : अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा सूर
 सत्कार सोहळ्यानंतर अवयवदात्यांच्या नातेवाईकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, प्रत्य्कानेच ते आज हयात नसले तरी अवयवरूपी जिवंत असल्याचे समाधान व्यक्त केले. 
  अवयवदाता सूरज दूधपचारे यांचे वडील मनोहर दूधपचारे म्हणाले, सूरजचे अचानक सोडून जाणे धक्कादायक आहे. परंतु अवयवदानाचे समाधानही आहे. अवयवदाता ज्ञानेश पशीने यांच्या पत्नी मनीषा म्हणाल्या, मृत्यूपूर्वी पतीने अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर इच्छा पूर्ण केल्याने तिघांना जीवनदान मिळाले. अवयवदाता सचिन गुप्ता यांची आई लक्ष्मी गुप्ता म्हणाल्या, तरुण मुलाचे अचानक सोडून जाणे जीवाला चटका लावणारे आहे. मात्र तो तीन व्यक्तीमध्ये अवयवरूपी जिवंत असल्याचे समाधान आहे. अवयवदाता रामकुमार खिलनानी यांच्या पत्नी सिमरन म्हणाल्या, पती नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर होते. मृत्यूनंतरही ते समाजाच्या उपयोगात आले. अवयवदाता सुभाष पुरी यांचा मुलगा स्वप्निल म्हणाले, वडिलांचे अस्तित्व आजही कायम आहे, हे माझ्यासाठी व कुटुंबीयांसाठी मानसिक आधार देणारे आहे. अवयवदाता झोया राणा हिची आई रोझीना म्हणाल्या, झोया माझ्यासाठी आजही जिवंत आहे. तिच्यामुळे केवळ तीन रुग्णांना नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही जीवनदान मिळाले आहे. 

अवयवदानाच्या इच्छेची नोंद ड्रायव्हिंग लायसन्सवर
नितीन गडकरी म्हणाले, अवयवदानाची इच्छा असणाऱ्या चालकांची नोंद वाहन परवान्यावरील म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्समध्ये असलेल्या ‘चिप’मध्ये घेतली जाईल. यामुळे अपघातात गंभीर जखमी व्यक्ती ‘ब्रेन डेड’ झाल्यास, अवयवदानाला मदत होईल. अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्यांचे प्राण वाचतील.

Web Title: Helipad on the highway for organ donation: Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.