हेलो...तुमचा फेसबुक फ्रेंड पाकिस्तानी एजंट तर नाही ना ?

By नरेश डोंगरे | Updated: March 24, 2025 18:34 IST2025-03-24T18:33:18+5:302025-03-24T18:34:11+5:30

सोशल मिडियावरची 'फ्लॅशगिरी' सांभाळून : आयएसआय 'हनी ट्रॅप'साठी सक्रिय

Hello...Is your Facebook friend a Pakistani agent? | हेलो...तुमचा फेसबुक फ्रेंड पाकिस्तानी एजंट तर नाही ना ?

Hello...Is your Facebook friend a Pakistani agent?

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे अनेक एजंट 'हनी ट्रॅप'साठी सज्ज असून, सोशल मिडियावर 'फ्लॅशगिरी' करणाऱ्यांना ते टार्गेट करीत आहेत. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारची तीन प्रकरणं उघड झाली आहेत.

सोशल मिडियावर स्वत:चे फोटो अन् माहिती वारंवार अपलोड करणाऱ्या थोडक्यात चमकोगिरी करणाऱ्यांना आयएसआय टार्गेट करते. महिला असेल तर तरुण आणि पुरूष असेल तर स्मार्ट तरुणी त्याला इन्स्टा,फेसबूकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविते. ती एक्सेप्ट झाल्यानंतर आधी सहजसाधी, नंतर रोमांटिक चॅटिंग होते. नंतर व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून आक्षेपार्ह्य स्थितीत संभाषण होते. पुढे रेकॉर्ड केलेले हेच व्हिडीओ व्हायरल करून सामाजिक जीवनातून उध्वस्त करण्याचा धाक दाखवून पाकिस्तानी एजंट 'त्या' व्यक्तीकडून संवेदनशिल माहिती काढून घेतात.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात अशाच प्रकारे पाकिस्तानच्या जाळ्यात अडकून हेरगिरी करणाऱ्या टंडेल, नायक आणि अभिलाश या तिघांना एनआयएने कर्नाटकमधून अटक केली. यानंतर राजस्थान इंटेलिजन्सने बिकानेरमधून पाकिस्तानी एजंटच्या हनी ट्रॅपमध्ये फसलेल्या भवानीसिंग नामक रेल्वे कर्मचाऱ्याला हेरिगरीच्या आरोपात अटक केली. दोन आठवड्यांपूर्वी यूपी एटीएसकडून फिरोजाबादजवळ विकासकुमारला अटक झाली. पाकिस्तानी एजंट नेहा शर्माच्या जाळ्यात अडकल्याने विकासने ऑर्डनन्स फॅक्टरीतील संवेदनशिल माहिती पाकिस्तानातील 'आका'ला पोहचवली होती. त्यानंतर लगेच रवींद्रकुमार नामक हेरही आगरा येथून पकडला गेला.

 

लोकमतचा ईशारा अन् नागपूर कनेक्शन

अनेक वर्षांपासून टार्गेट असलेल्या नागपुरात अनेकदा दहशतवादी पाठवून आयएसआयने 'संघ मुख्यालया'सह ठिकठिकाणची रेकी करवून घेतली आणि ब्रम्होस प्रकल्पात निशांत अग्रवाल नामक 'हेर'ही पेरून ठेवला होता.

विशेष म्हणजे, 'फेसबूक फ्रेण्ड' तुमच्याकडून हेरगिरी करवून घेऊ शकतो', असा ईशारा देणारे वृत्त 'लोकमत'ने २०१८ ला प्रकाशित केले होते. त्यानंतर चारच दिवसांनी नागपुरातील 'ब्रम्होस' प्रकल्पात काम करणाऱ्या निशांत अग्रवालला मिलिट्री इंटिलिजेंट आणि एटीएसने अटक केली होती.

नागपूर-आगरा एकच एजंट

अग्रवाल नागपुरातून पाकिस्तानला ब्रम्होसची माहिती पुरवित होता. त्याला जून २०२४ मध्ये न्यायालयाने आजन्म कारवासाची शिक्षा सुनावली. त्याला फसविणारी एजंट 'नेहा शर्मा' होती आणि आता आगरा येथे पकडण्यात आलेल्या विकासकुमारलाही पाकिस्तानमधील नेहा शर्मानेच हनी ट्रॅपमध्ये अडकवले, हे उल्लेखनीय !

Web Title: Hello...Is your Facebook friend a Pakistani agent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.