हेल्मेट घरी, वाहनचालक रस्त्यांवर

By Admin | Published: February 19, 2016 03:07 AM2016-02-19T03:07:24+5:302016-02-19T03:07:24+5:30

हेल्मेटमुळे चालकाचे संरक्षण होते. म्हणूनच प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे.

Helmet at home, driving roads | हेल्मेट घरी, वाहनचालक रस्त्यांवर

हेल्मेट घरी, वाहनचालक रस्त्यांवर

googlenewsNext

नागपूर : हेल्मेटमुळे चालकाचे संरक्षण होते. म्हणूनच प्रत्येक दुचाकीस्वाराने वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या घोषणेनंतर संपूर्ण राज्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली. ८ फेब्रुवारीला एकाच दिवशी सात हजारावर वाहनचालकांवर कारवाई झाली. याच धास्तीने बहुसंख्य वाहनचालकांनी हेल्मेटची खरेदी केली. परंतु गेल्या दहा दिवसांत कारवाई थंडावल्याने हेल्मेट घरी, वाहनचालक रस्त्यावर अशी स्थिती निर्माण झाली आहे.
२००८ नंतर वाहतूक पोलीस विभागाने हेल्मेटसक्तीची कारवाई हाती घेतली. नागपुरात कधी नव्हे ती एकाच दिवशी ७ हजार २६३ वाहनचालकांवर कारवाई झाली. परंतु हेल्मेट विकत घेण्यासाठी वेळ न देता कारवाई होत असल्याची ओरड सुरू झाल्याने व हेल्मेटच्या काळाबाजाराला आलेला ऊत पाहून काही दिवस कारवाई शिथिल केली. पोलिसांनी सीटबेल्ट, सिग्नल जम्पिंग, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबरप्लेट याकडे लक्ष वळविले.

Web Title: Helmet at home, driving roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.