विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ते करतात घरफोड्या, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 10:50 PM2018-10-10T22:50:46+5:302018-10-10T22:52:38+5:30

घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी आतापर्यंत १० ठिकाणी हात साफ केल्याची कबुली दिली.

With the help of a child, they do burglary, both arrested | विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ते करतात घरफोड्या, दोघांना अटक

विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ते करतात घरफोड्या, दोघांना अटक

Next
ठळक मुद्देतीन लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरफोडी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ च्या पथकाने ताब्यात घेतले. यामध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून २ लाख ८८ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी आतापर्यंत १० ठिकाणी हात साफ केल्याची कबुली दिली.
मो. एहसा मो. रफिक (२४, रा. गरीब नवाजनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याशिवाय अन्य एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे. आरोपींनी यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगरातील किशोर बाजीराव कोळप (३९) यांच्याकडे घरफोडी केली. याबाबत यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्र. ५ चे पथक करीत होते. दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना एक व्यक्ती त्यांना राजीव गांधी पुलाजवळ संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. त्यामुळे पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल हॅन्डसेट आढळून आला. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याने सदर मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. त्यासोबतच यशोधरानगरातही चोरी केल्याची त्याने कबुली दिली. आरोपी मो. एहसा मो. रफिक याने विधिसंघर्ष बालकासोबत आतापर्यंत यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, शांतिनगर आणि कळमना ठाण्याच्या हद्दीत दोन तर पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असे एकूण १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले. आरोपींकडून सदर गुन्ह्यातील एकूण २ लाख ८८ हजार ५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी. जी. गायकर, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संजीव कांबळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, विक्रांत सगणे, दिनेश लबडे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चेचरे, सुनील राऊत, पोलीस हवालदार राजेश यादव, प्रशांत लांडे, मंगेश लांडे, अजय बघेल, कन्हैया लिल्हारे, नायक पोलीस शिपाई नामदेव टेकाम, रवी शाहू, नरेंद्र ठाकूर, पोलीस शिपाई प्रीतम ठाकूर, नावेद शेख, अमोल भक्ते, उत्कर्ष राऊत, फराज खान यांनी पार पाडली.

Web Title: With the help of a child, they do burglary, both arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.