नागपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेकडून केरळ पूरग्रस्तांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:32 PM2018-08-31T23:32:42+5:302018-08-31T23:34:01+5:30
नागपुरातील पेपर विक्रेता संघटनेने केरळ येथे आलेल्या पुरामुळे नागरिकांवर आलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेतर्फे कपडे, साड्या, चप्पल, चादर, ब्लँकेट, लहान मुलांची खेळणी, धान्य व इतर साहित्य रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील पेपर विक्रेता संघटनेने केरळ येथे आलेल्या पुरामुळे नागरिकांवर आलेल्या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. संघटनेतर्फे कपडे, साड्या, चप्पल, चादर, ब्लँकेट, लहान मुलांची खेळणी, धान्य व इतर साहित्य रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आले आहे.
या उपक्रमात प्रत्येक सेंटरवरील पेपर विक्रेता बंधूनी सहयोग केला आहे. त्यांनी आपल्या ग्राहकांनासुद्धा मदतीचे आवाहन केले होते. त्यांच्याकडूनही अपेक्षेपेक्षा जास्त मदत मिळाली आहे. या कार्यात नागपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रमेश नागलकर, अमोल तितरमारे, राकेश आकरे, गौतम मेश्राम, भोजराज उरकुडे, राजकुमार नगरारे, रवि नंदनवार, सुजित नेमाडे, नीळकंठ निबर्ते, मनीष वासनिक, राम पांडे, भूषण माने, नितीन खोब्रागडे, बंटी गंथाडे वैभव माटोळे, मनीष आडोकर, रवींद्र नागपुरे, ओंकार काळेकर, दिलीप आडोकर यांच्यासह महिला मंडळातील कविता नागलकर, शिल्पा निंबार्ते, किरण मेश्राम, शिल्पा वासनिक, संघमित्रा गावंडे, हर्षा वासनिक, ज्योती नगरारे, काजल नगरारे, शकुंतला गायकवाड, सुनिता कोलेकर, आशा माटोडे, सुनिता पाटील, विशाखा कांबळे, रमाबाई रामटेके, उषा बोरकर, आशा कांबळे, वर्षा सक्सेना, मंजु कोरी, वर्षा उके, समिता कोरी, पूजा गावंडे, रुपाली जवादे, सुजाता लोखंडे, महानंदा मेश्राम, किरण मेश्राम, प्राधन्या तेलतुंबडे, माधुरी गजभिये, योगिता रामटेके, संजीवनी रामटेके, निशा तेलतुंबडे, चंदा तेलतुंबडे, प्रियंका रामटेके, चंद्रकला रामटेके, अभिता सिलेकर, सारिका वासनिक, साधना मोटघरे, शिला उंदिरवाडे, शोभा साळवे, स्वाती सिलेकर, लीना पोहणेकर, मिता भिलावे, लीना नाईक, रमा गुप्ता, शिल्पा उंदिरवाडे, मेघा साळवे, मनीष बाभूळकर, उज्ज्वला राणेकर, लक्ष्मी सिलेकर शालू दुधाळकर, सविता, पूजा उमाटे, शुभांगी पुजेकर, उषा डोकरेमारे, प्रीती ठवरे, संगीता गेडाम या सगळ्यांची मदत मिळाली.