नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल - सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

By सुमेध वाघमार | Published: August 26, 2023 06:16 PM2023-08-26T18:16:55+5:302023-08-26T18:17:22+5:30

मेडिकलमध्ये नेत्रदान पंधरवडाचा शुभारंभ

Help of cine artistes will be taken for eye donation awareness - Cultural Affairs Minister Mungantiwar | नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल - सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

नेत्रदान जनजागृतीसाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल - सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार

googlenewsNext

नागपूर : कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे अंधत्व येऊ नये, आणि जर आलेच तर ती व्यक्ती कायम अंध राहू नये, यासाठी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करायला हवे. परंतु गैरसमजामुळे नेत्रदान होत नाही. यामुळे जनजागृतीची मोठी गरज आहे. यासाठी सिने कलावंतांची मदत घेतली जाईल, अशी ग्वाही वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे दिली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागाच्यावतीने आयोजित ‘नेत्रदान पंधरवडा’चा शुभारंभ शनिवारी झाला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, नेत्ररोग विभागाचा प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, माजी विभाग प्रमुख डॉ. अशोक मदान आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. गजभिये यांनी केले. या प्रसंगी डॉ. अतुल राजकोंडावार, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. विनोद खंडाईत, डॉ. सिंगाडे, डॉ. कविता धाबर्डे, डॉ. निलेश गादेवार, डॉ. पियूष मदान, डॉ. मुरारी सिंग आदी उपस्थित होते. संचालन डॉ. शिवानी साडंगी व डॉ. आयुषी डागा यांनी केले तर आभार डॉ. मिनु चौधरी यांनी मानले. 
  
-‘रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थाल्मोलॉजी’साठी प्रयत्न 

मेडिकलच्या नेत्ररोग विभागात येणाºया रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावे, नेत्ररोगाशी संबंधित विविध आजारावर संशोधन व्हावे यासाठी ‘रिजनल इन्स्टिट्यूट ऑॅफ ऑप्थाल्मोलॉजी’ गरजेचे आहे. यासाठी मेडिकलने तसा प्रस्ताव तयार करून द्यावा. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना स्वत: भेटून इन्स्टिट्यूटसाठी प्रयत्न केले जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले. 

- मानवतेच्या हितासाठी कार्य करा, सर्वांनी नेत्रदान करा

‘नेत्रदान श्रेष्ठ दान’, ‘मानवतेच्या हितासाठी कार्य करा, सर्वांनी नेत्रदान करा’ असे आवाहन करणारे फलक हाती घेऊन मेडिकल व नर्सिंग कॉलेजच्या ५०० विद्यार्थ्यांनी शहरात नेत्रदान जनजागृती रॅली काढली. त्यापूर्वी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. डॉ. अशोक मदान व डॉ मिनल व्यवहारे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीमध्ये मेडिकलचे एनसीसीचे विद्यार्थी, परिचारिका, कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Help of cine artistes will be taken for eye donation awareness - Cultural Affairs Minister Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.