घरून निघून आलेल्या अल्पवयीन मुलीला केली मदत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:09 AM2021-01-15T04:09:17+5:302021-01-15T04:09:17+5:30
नागपूर : घरून निघून आलेली एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद स्थितीत फिरताना दिसली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने तिची विचारपूस केल्यानंतर ...
नागपूर : घरून निघून आलेली एक अल्पवयीन मुलगी संशयास्पद स्थितीत फिरताना दिसली. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने तिची विचारपूस केल्यानंतर रेल्वे चाईल्ड लाईनच्या सुपूर्द केली. ही घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली.
रेल्वे सुरक्षा दलाच्या सीसीटीव्ही कक्षात उपस्थित भूपेंद्र बाथरी यास कॅमेरा क्रमांक ६० मध्ये एक अल्पवयीन मुलगी एका मुलासोबत संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळली. याची सूचना त्याने बी. एस. बघेल यांना दिली. भूपेंद्र बाथरी आणि दीपक पवार यांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली. यावेळी मुलाने आपले नाव कुलदिप सिंह (२२) रा. हरियाणा जिल्हा मुरादाबाद, उत्तर प्रदेश सांगितले. मुलीच्या कुटुंबीयांना न सांगता तो मुलीला पळवून नेत होता. मुलीला आरपीएफ ठाण्यात आणून आरपीएफ महिला पोलीस उषा तिग्गा यांनी तिची चौकशी केली. तिच्या कुटुंबीयांशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मुलीचे कुटुंबीय तिला घेण्यासाठी नागपूरकडे निघाले. तोपर्यंत या अल्पवयीन मुलीला रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधींकडे सोपविले. रेल्वे सुरक्षा दलाने वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे अल्पवयीन मुलीची सुरक्षा करण्यात यश मिळाले आहे.