कोरोनाकाळात गरजूंना मदत हीच खरी संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:06 AM2021-07-01T04:06:44+5:302021-07-01T04:06:44+5:30
‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत २ जुलैपासून रक्तदान मोहिमेला सुरुवात होत आहे. या उपक्रमात मेघे ग्रुपअंतर्गत येणाऱ्या तिरुपती अर्बन ...
‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत २ जुलैपासून रक्तदान मोहिमेला सुरुवात होत आहे. या उपक्रमात मेघे ग्रुपअंतर्गत येणाऱ्या तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमि नागपूर आणि स्कूल ऑफ स्काॅलर्सचा विशेष सहभाग आहे. या पुढाकाराबद्दल समीर मेघे म्हणाले, १ मे २०२० रोजी आपण प्रथम रक्तदान केले. कोरोनाच्या काळात माणसे एकमेकांना टाळत असताना लोकमतने मात्र माणसांजवळ जाऊन रक्तदानासाठी पुढाकार घेतला. समाजातील घटकांपर्यंत पोहोचून या माध्यमातून रक्ताची गरज पूर्ण करण्याची उदात्त भावना आपणास आवडली. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये दीड ते दोन महिने अनेकांना मोफत अन्न वितरित केले. दुसऱ्या लाटेमध्येही अशीच मदत केली. शालिनीताई मेघे हॉस्पिटल, सावंगी मेघे हॉस्पिटलच्या माध्यमातृून ८०० लोकांना उपचारासाठी मदत केली.
श्री दत्ता मेघे फाउंडेशनचाही पुढाकार
श्री दत्ता मेेघे फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. नदी खोलीकरण, पांदण रस्ता दुरुस्ती, ग्रामीण भागामध्ये बससेवा यासारखी कामे करून ग्रामिणांना सामूहिक लाभ दिला. तिरुपती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून मागील २० वर्षांपासून अर्थसाहाय्य केले जात आहे. कर्जवाटप, अडलेल्या शेतकऱ्यांना मदत, खाजगी सेक्टरलाही सहकार्य केले जात आहे.
...
साई आश्रमचे निराधारांना बळ
हिंगणा मतदारसंघातील ‘साई आश्रम’च्या माध्यमातून ६० निराधार मुलांची निवास व भोजनाची व्यवस्था मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. नेल्सन मदर अँड चाइल्ड हाॅस्पिटलला वाहन देऊन गरज पूर्ण केली. कॅन्सरचे निदान करणारी मेमोग्राफिक बस दिली. या माध्यमातून ७० ते ८० टक्के गावांमध्ये मागील ७ वर्षांपासून ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्या महिलांवर उपचार केले जात आहेत.
....
२,५०० कोटी रुपयांची कामे
हिंगणा मतदारसंघामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात २,५०० कोटी रुपयांची कामे केली. बुटीबोरीमधील उड्डाणपूल मंजूर करून पूर्ण केला. वाहतूककोंडी सुटली. एएसआयसी हाॅस्पिटल मंजूर केले. बस डेपो उभारला. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या. आठ सबस्टेशन उभारले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून निधी मिळवून किनाळा, माकडी या गावांचे पुनर्वसन पूर्ण केले. रखडलेला तुरागोंदी प्रकल्प पूर्ण केला. लखमापूर प्रकल्पातील पिंपळधराच्या पुनर्वसनाला मान्यता मिळाली असून निविदाही निघाल्या आहेत.
...