निवडणूक आयोगाची मतमोजणीसाठी हेल्पलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:40 AM2019-05-20T11:40:27+5:302019-05-20T11:41:23+5:30
येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी संदर्भात काही माहिती व तक्रार असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणी संदर्भात काही माहिती व तक्रार असल्यास भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.
१९५० हा हेल्पलाईन नंबर असून नागरिकांना मतमोजणीबाबत काही माहिती हवी असल्यास किंवा तक्रार करावयाची असल्यास ते या नंबरवर करू शकतात.
नागपूरच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा यांनी ही माहिती दिली. नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघाची मतमोजणी ही २३ तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड चिखली ले-आऊट कळमना येथे सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार मतमोजणी संदर्भात माहिती आणि तक्रार असल्यास नागरिक १९५० या हेल्पलाईनवर फोन करू शकतात. ही हेल्पलाईन सोमवार २० मे रोजी सकाळी ८ वाजेपासून सक्रिय करण्यात आलेली आहे. तेव्हा नागरिकांना यावर संपर्क साधता येईल.