हेमलता पवार, सोहम नवघरे अव्वल

By admin | Published: August 24, 2015 02:34 AM2015-08-24T02:34:07+5:302015-08-24T02:34:07+5:30

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे रविवारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. दोन्ही गटात मुख्य तीन पुरस्कारांसह ओसीपीसी ज्युरी व प्रोत्साहन पुरस्कारही प्रदान करण्यात आलेत.

Hemlata Pawar, Sohum Navghare Top | हेमलता पवार, सोहम नवघरे अव्वल

हेमलता पवार, सोहम नवघरे अव्वल

Next

छायाचित्र स्पर्धा : आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचा उपक्रम
नागपूर : आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब (ओसीपीसी)तर्फे जागतिक छायाचित्र दिवसानिमित्त आयोजित २० व्या छायाचित्र स्पर्धेतील व्यावसायिक गटात हेमलता पवार तर, हौशी गटात सोहम नवघरे यांनी अव्वल क्रमांक पटकावला. तसेच, अभिराम मेहंदळे व निरंजन डोमडे यांनी व्यावसायिक तर, रोहित बेलसरे व ऐश्वर्या हरकरे यांनी हौशी गटामध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे रविवारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. दोन्ही गटात मुख्य तीन पुरस्कारांसह ओसीपीसी ज्युरी व प्रोत्साहन पुरस्कारही प्रदान करण्यात आलेत. आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव मनीष मिश्रा, माही समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तुषार रावल प्रमुख अतिथी म्हणून तर, क्लबचे अध्यक्ष चेतन जोशी, सचिव राजन गुप्ता, प्रकल्प समन्वयक रमाकांत झाडे व्यासपीठावर उपस्थित होते. व्यावसायिक गटासाठी ‘आनंद’ हा विषय होता. हौशी गटाला विषयाचे बंधन नव्हते. स्पर्धेतील छायाचित्रांचे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे १९ ते २३ आॅगस्टपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.(प्रतिनिधी)
आमूलाग्र बदल
छायाचित्र समाजाचे प्रतिबिंब असतात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रकारितेमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे.
-कृष्णा खोपडे, आमदार
प्रचंड स्पर्धा
आता छायाचित्रकारांमध्येही प्रचंड स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी सर्जनशील कार्य करणे आवश्यक आहे.
-डॉ. देवराव होळी, आमदार
महत्त्वाचे स्थान
मानवी जीवनात छायाचित्रकारांचे महत्त्वाचे स्थान आहे. आनंदाच्या प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्रकार उपस्थित असतो.
-मनीष मिश्रा.
पुरस्कार विजेते
व्यावसायिक गट : प्रथम - हेमलता पवार (जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन पुरस्कार - रोख ११ हजार), द्वितीय - अभिराम मेहंदळे (हेरिटेज फिल्म डिजायनर्स पुरस्कार - रोख ५००० ), तृतीय - निरंजन डोमडे (श्याम कलर लॅब पुरस्कार - रोख ३०००), प्रोत्साहनपर पुरस्कार (प्रत्येकी १००१) - रामदास पद्मावार (सरला इंदाने स्मृती), अभिनव गुप्ता (श्रीधर डोर्लीकर स्मृती), अजय आगाशे (शंकर बानाबाकोडे स्मृती), प्रदीप निकम (रमेशचंद्र जोशी स्मृती), आशिष अरणकर (भय्यासाहेब झाडगावकर स्मृती), ओसीपीसी ज्युरी पुरस्कार - दिनेश तितरे (मोहनकुमार भगत स्मृती - रोख ५०००).
हौशी गट : प्रथम - सोहम नवघरे (जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन पुरस्कार- रोख ५०००), द्वितीय - रोहित बेलसरे (दुर्गा फोटो लॅमिनेशन - रोख ३०००), तृतीय - ऐश्वर्या हरकरे (प्रवीण डिजिटल अल्बम - रोख २०००), प्रोत्साहनपर पुरस्कार (प्रत्येकी १००१ रुपये) - तनया पनपालिया, भैरवी दामले, हर्षद धापा, कुमार नंदाने (नत्थुराम झाडे स्मृती), आयुष अग्रवाल (रामचंद्र गुप्ते स्मृती), ओसीपीसी ज्युरी पुरस्कार - पूजा सावरकर (गंगाप्रसाद गुप्ता स्मृती - रोख २०००).

Web Title: Hemlata Pawar, Sohum Navghare Top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.