‘हेपेटायटिस बी’चा धोका एचआयव्हीपेक्षा अधिक

By admin | Published: January 12, 2015 01:04 AM2015-01-12T01:04:20+5:302015-01-12T01:04:20+5:30

भारतात ‘हेपेटायटिस बी’ने चार कोटी जणांना ग्रासले आहे. याचा धोका एचआयव्हीहून अधिक आहे. सध्या देशात एचआयव्हीबाधित २५ लाख रुग्ण आहेत, याच्या तुलनेत हेपेटायटिस बीच्या

'Hepatitis B' risks more than HIV | ‘हेपेटायटिस बी’चा धोका एचआयव्हीपेक्षा अधिक

‘हेपेटायटिस बी’चा धोका एचआयव्हीपेक्षा अधिक

Next

गॅस्ट्रोकॉन-२०१५ : दोन दिवसीय परिषदेचा समारोप
नागपूर : भारतात ‘हेपेटायटिस बी’ने चार कोटी जणांना ग्रासले आहे. याचा धोका एचआयव्हीहून अधिक आहे. सध्या देशात एचआयव्हीबाधित २५ लाख रुग्ण आहेत, याच्या तुलनेत हेपेटायटिस बीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यामुळे लिव्हर (यकृत) कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे ‘हेपेटायटिस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात, अशी माहिती डॉ. दीपक अमरापूरकर यांनी दिली.
मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अमरापूरकर म्हणाले, हेपेटायिटस ‘बी’ हा गंभीर आजार असून, त्यावरील लस ही विकसित झालेली आहे. हेपेटायिटस ‘डी’ आणि ‘इ’ त्याप्रमाणात धोकादायक नाहीत. परंतु हेपेटायिटस ‘सी’ची विषाणूबाधा त्यातुलनेत गंभीर मानली जाते. हेपेटायटिस ‘सी’ची लसच उपलब्ध नाही. यामुळे हेपेटायटिस ‘सी’ विषाणूबाधेचा धोका आणखी गंभीर बनतोय, कारण या विषाणूबाधेचं निदान करणं अतिशय अवघड आहे. यकृतात हेपेटायटिस ‘सी’ची बाधा झाल्यावर कित्येक वर्षे हे विषाणू सुप्तावस्थेत राहू शकतात. पण यकृतावर याचा विपरीत परिणाम होत असतो, असेही ते म्हणाले.
आज दुपारपर्यंत चाललेल्या सत्रात डॉ. प्रवीण राठी, डॉ. टी.एस. चंद्रशेखर, डॉ. मोहन रामचंदानी, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. कुलविंदर दुवा, डॉ. रंधीर सूद आणि डॉ. एस.के. त्यागी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
परिषदेत विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जवळपास ९५० डॉक्टर सहभागी झाले होते. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी सहभागी सर्व तज्ज्ञांचे आभार मानले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुकेवार यांच्यासह डॉ. वैभव गंजेवार, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख आणि डॉ. विजय वर्मा आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
दारू टाळा
कावीळ बरा झाल्यानंतरही काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचं असते. काविळीचा यकृतावर परिणाम होतो. काही लोकांचा कावीळ बरा झाल्यानंतर दारूपानाचे कार्यक्र म सुरू ठेवतात. यामुळे यकृत पूर्णत: खराब होण्याची शक्यता अधिक असते.
इन्डोस्कोपीचा ३० वर्षांचा प्रवास
आशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हैदराबादचे संचालक डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी इन्डोस्कोपीचा ३० वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. पूर्वी होणारा वापर, आता त्यात झालेला बदल आणि भविष्यातील डेव्हलपमेंटवर त्यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: 'Hepatitis B' risks more than HIV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.