अतिवृष्टीचा इशारा

By admin | Published: June 21, 2015 02:48 AM2015-06-21T02:48:16+5:302015-06-21T02:48:16+5:30

सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात मान्सूनचा चांगलाच जोर वाढला आहे. हवामान विभागाने २१ ते २४ जूनपर्यंत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

High alert | अतिवृष्टीचा इशारा

अतिवृष्टीचा इशारा

Next

पावसाचा जोर वाढला : जिल्ह्यात १३५ मिमि पाऊ स
नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह विदर्भात मान्सूनचा चांगलाच जोर वाढला आहे. हवामान विभागाने २१ ते २४ जूनपर्यंत विदर्भात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यानुसार विदर्भातील सर्व जिल्ह्यात तुफान पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील पाच दिवसांपासून उपराजधानीत रोज पाऊ स हजेरी लावत आहे. त्यानुसार शनिवारीसुद्धा जोरदार हजेरी लावली. रात्री ९ वाजतापर्यंत शहरात एकूण ११ मिमि पावसाची नोंद करण्यात आली होती.
मान्सून संपूर्ण विदर्भात सक्रिय झाला आहे. शनिवारी दिवसभरात दोन टप्प्यात पाऊ स कोसळला. पहिल्या टप्प्यात दुपारी ४ वाजता पावसाला सुरुवात झाली होती. यानंतर काही वेळ उसंत घेऊ न सायंकाळी ६ वाजता पुन्हा दुसऱ्या टप्प्यात धो-धो पाऊ स बरसला. याशिवाय शुक्रवारी रात्री ९ वाजता सुद्धा धुवाँधार पाऊस कोसळला होता. रोज सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतुकीची दाणादाण उडाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १३५ मिमि पाउस पडला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात १८० मिमि म्हणजे, विदर्भात सर्वांधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या मते, सध्या ओडिसा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार पुढील २४ जूनपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

Web Title: High alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.