नागपूर विमानतळावर हाय अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:43 AM2019-02-24T00:43:33+5:302019-02-24T00:44:31+5:30
भारतीय विमानाला हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याच्या धमकीचा फोन शनिवारी मुंबईत एका विमान कंपनीच्या ऑपरेटरला आल्यानंतर आज देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला. नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित केल्याचा परिणाम दिवसभर दिसून आला. सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय विमानाला हायजॅक करून पाकिस्तानात नेण्याच्या धमकीचा फोन शनिवारी मुंबईत एका विमान कंपनीच्या ऑपरेटरला आल्यानंतर आज देशातील सर्व विमानतळावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला.
नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित केल्याचा परिणाम दिवसभर दिसून आला. सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. प्रवासी आणि परिसरात येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात आली. सीआयएसएफ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर हाय अलर्टचा मॅसेज आला आहे. प्रवाशांची नियमितऐवजी बॅगची कडक तपासणी करण्यात येत आहे. विमान कंपन्यांतर्फे प्रवाशांना वेळेपूर्वी पोहोचण्यास सांगितले आहे. संशयानंतर परिसरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. विमानतळ परिसरात सुरक्षा वाढविण्याचे निर्देश मिळाले आहेत. या विमानतळावर गर्दी असल्यामुळे क्विक रिअॅक्शन टीम तैनात केली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती पाहता देशातील सर्वच विमानतळावर हाय अलर्टची घोषणा केली आहे. विमानतळावर सोमवारी सुरक्षासंबंधित सर्व एजन्सींची बैठक घेण्यात येणार आहे.