वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर २ ऑगस्टला हायकाेर्टात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:21+5:302021-07-31T04:08:21+5:30

मराविमं सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संघ व मराविमं निवृत्त कर्मचारी संघ, नागपूरचे अशाेक पाराशर, अशाेक जैन, अनिल साठे आणि अरुण ...

High Court hearing on pension of power employees on August 2 | वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर २ ऑगस्टला हायकाेर्टात सुनावणी

वीज कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर २ ऑगस्टला हायकाेर्टात सुनावणी

Next

मराविमं सेवानिवृत्त कर्मचारी कल्याण संघ व मराविमं निवृत्त कर्मचारी संघ, नागपूरचे अशाेक पाराशर, अशाेक जैन, अनिल साठे आणि अरुण अग्रवाल यांनी सांगितले, या याचिकेवर आता शेवटच्या टप्प्यातील सुनावणी हाेणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे पेन्शन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. त्या सर्वांचे डाेळे न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहेत. तत्कालीन महाराष्ट्र विद्युत मंडळाने ३१ डिसेंबर १९९६ राेजी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या पेन्शन याेजनेच्या धर्तीवर पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला हाेता. २७ जानेवारी २००१ राेजी विधानसभेत यासंदर्भात प्रस्ताव पारित करण्यात आला. मात्र, अद्याप त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रस्तावानुसार तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांना पेन्शन याेजना लागू करण्याचे निर्देश विद्युत मंडळाला दिले. त्यानंतरही पेन्शन लागू झाली नसून यासंदर्भातील याचिका विचाराधीन आहे. २०२० मध्ये यावर अंतिम सुनावणी हाेणार हाेती; पण काेराेना प्रकाेपामुळे न्यायालयाचे कामकाज प्रभावित झाले आणि सुनावणी टळली. आता नागपूर खंडपीठाने २ ऑगस्ट राेजी सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. काेराेना संक्रमण काळात २०० च्या वर कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Web Title: High Court hearing on pension of power employees on August 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.