जुन्या भंडारा रोडसाठी हायकोर्टाचा मार्ग

By admin | Published: June 26, 2014 12:47 AM2014-06-26T00:47:18+5:302014-06-26T00:47:18+5:30

अतिक्रमण हटवून जुन्या भंडारा रोडचा विकास करण्यासाठी मध्य नागपूर विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मार्ग धरला आहे. यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

High Court route for Old Bhandara Road | जुन्या भंडारा रोडसाठी हायकोर्टाचा मार्ग

जुन्या भंडारा रोडसाठी हायकोर्टाचा मार्ग

Next

नागपूर : अतिक्रमण हटवून जुन्या भंडारा रोडचा विकास करण्यासाठी मध्य नागपूर विकास आघाडीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मार्ग धरला आहे. यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी आज, बुधवारी याप्रकरणी राज्य शासनाच्या नगर विकास विभागाचे सचिव, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महानगरपालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) व जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावून तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यांमध्ये आघाडीसह समाजसेवक रवींद्र पैगवार व भूषण दडवे यांचा समावेश आहे.
नगरविकास विभागाने ७ जानेवारी २००० रोजी मंजूर केलेल्या विकास आराखड्यानुसार मेयो रुग्णालय ते भंडारा रोडपर्यंतचा रोड १८ मीटर रुंद आहे. या रोडवर ९ मीटरपर्यंत अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे १३ जानेवारी २०१० रोजी महाराष्ट्र नगर रचना कायद्याच्या कलम २६ अनुसार अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. याविरुद्ध अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात तीन वेगवेगळ्या रिट याचिका दाखल केल्या होत्या. १९ नोव्हेंबर २०१० रोजी न्यायालयाने तिन्ही याचिका निकाली काढून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु, यानंतर प्रतिवादीनी काहीच केले नाही. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागितली असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात. यासंदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत. परंतु, सर्वांनी कानावर हात ठेवले आहेत. आंदोलन करूनही काहीच हालचाल केली जात नाही. यामुळे हा प्रश्न १४ वर्षांपासून लटकलेला आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे पी. के. मिश्रा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: High Court route for Old Bhandara Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.