उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:48+5:302021-04-02T04:07:48+5:30

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज केले जाईल. त्यासंदर्भात गुरुवारी नोटीस जारी करण्यात ...

The High Court will proceed as per the new schedule from Monday | उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज

उच्च न्यायालयात सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज

Next

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून नवीन नियोजनानुसार कामकाज केले जाईल. त्यासंदर्भात गुरुवारी नोटीस जारी करण्यात आली. नवीन नियोजन पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केवळ तातडीची व अत्यावश्यक प्रकरणेच ऐकली जातील.

५ व ७ एप्रिल रोजी न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व नितीन सूर्यवंशी यांचे न्यायपीठ फौजदारी अपील व फौजदारी रिट याचिका, ५ एप्रिल ते पुढील सर्व कामकाजाच्या दिवशी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांचे न्यायपीठ दिवाणी रिट याचिका व सर्व जनहित याचिका, न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांचे न्यायपीठ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, प्रथम अपील, कुटुंब न्यायालय अपील, अवमानना अपील, अवमानना याचिका, न्या. विनय देशपांडे हे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज, न्या. स्वप्ना जोशी या द्वितीय अपील, किरकोळ दिवाणी अर्ज, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज (५ ते ९ एप्रिलपर्यंत), न्या. रोहित देव हे अटकपूर्व जामीन अर्ज, फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, न्या. विनय जोशी हे नियमित जामीन अर्ज, ५ ते ९ एप्रिलपर्यंत सर्व फौजदारी अपील्स, १० एप्रिलनंतर २०११ पर्यंतच्या सर्व फौजदारी अपील्स, ६, ८ व ९ एप्रिल आणि १५ एप्रिल ते पुढील सर्व कामकाजाच्या दिवशी न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांचे न्यायपीठ फौजदारी अपील व फौजदारी रिट याचिका तर, १० एप्रिल ते पुढील सर्व कामकाजाच्या दिवशी न्या. नितीन सूर्यवंशी हे २०१२ व त्यानंतरच्या वर्षातील फौजदारी अपील व सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतच्या अर्जांचे कामकाज पाहतील.

Web Title: The High Court will proceed as per the new schedule from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.