हाय ग्रोथ कंपनी क्रमवारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:04 AM2020-12-28T04:04:57+5:302020-12-28T04:04:57+5:30
वाणिज्य बातमी .. ८ बाय २ ... नागपूर : मार्केट रिसर्च आणि ग्राहक डेटामध्ये तज्ज्ञ असलेली एक जर्मन कंपनी ...
वाणिज्य बातमी .. ८ बाय २ ...
नागपूर : मार्केट रिसर्च आणि ग्राहक डेटामध्ये तज्ज्ञ असलेली एक जर्मन कंपनी फायनान्शियल टाइम्स आणि स्टॅटिस्टाने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील औद्योगिक वस्तू क्षेत्रात देशातील पाण्याच्या टाक्या आणि पाईप उत्पादनाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेली आर सी प्लास्टो टँक्स अॅण्ड पाईप्स प्रा.लि. सातवा क्रमांक, ऑल सेक्टरमध्ये ७९ वा आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रात ३४९ व्या क्रमांकावर आहे. या वर्षीच्या सर्वेक्षणात भारत, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, तायवान, जपान, न्यूझीलंड आणि फिलिपिन्स या देशांसह आशिया-पॅसिफिक प्रदेशातील ११ देशांचा समावेश आहे. सर्वेक्षणात आर सी प्लास्टोला आशिया पॅसिफिक क्षेत्रात उच्च महसूल वाढीची कंपनी म्हणून मान्यता मिळाली आहे. आशिया-पॅसिफिक प्रदेशातील उच्च वाढीच्या कंपन्यांचा विशेष अहवाल देशाच्या अग्रगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. नावीन्यपूर्ण आणि वेगाने वाढणाऱ्या कंपन्या ही आशिया-पॅसिफिक अर्थव्यवस्थेमागील प्रेरक शक्ती आहे. या कंपन्या रोजगार निर्माण करतात आणि या क्षेत्राची स्पर्धात्मकता राखतात. म्हणून हा सन्मान महत्त्वपूर्ण आहे. आर सी प्लास्टोसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. (वा.प्र.)