न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक

By admin | Published: December 31, 2016 02:59 AM2016-12-31T02:59:30+5:302016-12-31T02:59:30+5:30

न्याय व विधी क्षेत्रासाठी दोन वर्षांत ११०० कोटी रुपयांची तरतूद केली. महाराष्ट्र हे न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करणारे देशात पहिले राज्य आहे.

Highest for justice and legal zones | न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक

न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक

Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपूजन
नागपूर : न्याय व विधी क्षेत्रासाठी दोन वर्षांत ११०० कोटी रुपयांची तरतूद केली. महाराष्ट्र हे न्याय व विधी क्षेत्रासाठी सर्वाधिक तरतूद करणारे देशात पहिले राज्य आहे. ही तरतूद न्यायालय इमारती आणि न्यायाधीशांच्या निवासासाठी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे येथे सांगितले.
जिल्हा वकील संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा न्यायालय नागपूरच्या विस्तारित नवीन ईमारतीचे भूमीपूजन सोहळयाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी , मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पुष्पा गणेडीवाला, राज्याचे महाधिवक्ता रोहित देव आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव एन. जे. जमादार उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या नवीन इमारतीला अद्ययावत पायाभूत सोयी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
तसेच पार्किंगची समस्या सोडवण्यात येईल, केंद्र सरकारच्या मदतीने बहुमजली पार्किंग व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, सुयोग इमारतीचा विकास केला जाईल, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या बार रूमसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याच्या बंगल्याच्या परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयासाठीही परिक्षेत्र महानिरीक्षकाच्या कार्यालयासमोरील जागा देण्यात आलेली आहे. अकोला, अमरावती या ठिकाणच्या न्यायालयीन इमारतीचे बांधकामही ३-४ महिन्यात पूर्णत्वास येणार आहे. नाशिक येथे न्यायालय इमारतीचा प्रश्नही सोडवण्यात आला असून न्यायालयासाठी अडीच एकर जागा देण्यात आलेली आहे. मुंबईच्या बांद्रा येथे उच्च न्यायालयाची अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
नवीन न्यायालयाच्या इमारतीचे स्थापत्य व उपयोगिता सुंदर रितीने घडविण्यात याव्यात. या इमारतीमध्ये सर्व प्रकारची कनेक्टिव्हिटी स्थापित करून न्यायदानाच्या या कार्यसंस्कृतीमध्ये जास्तीत जास्त माहिती तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशी सूचना करून ही नवीन इमारत विक्रमी वेळेत पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)

Web Title: Highest for justice and legal zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.