महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, ९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात; ८३२ नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 08:56 PM2017-11-04T20:56:17+5:302017-11-04T20:56:28+5:30

महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १४०० हून अधिक अपघात झाले. यात ८२५ हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे.

Highways became the trap of death, more than 1,400 accidents in 9 months; 832 deaths | महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, ९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात; ८३२ नागरिकांचा मृत्यू

महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, ९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात; ८३२ नागरिकांचा मृत्यू

googlenewsNext

नागपूर - महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १४०० हून अधिक अपघात झाले. यात ८२५ हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला ५ अपघात झाले असून यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१७ मध्ये विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले , किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, या पोलिसांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत महामार्गांवर १४४१ अपघात झाले. यात ८३२ नागरिकांचा मृत्यू झाला तर १०१५ जण जखमी झाले. बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले. या अपघातांत ११ पोलीस कर्मचाºयांचादेखील मृत्यू झाला.

‘ट्रक’ सर्वात धोकादायक
महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात ट्रकचे झाले आहेत. ९ महिन्यांच्या कालावधीत ट्रक्सचे ३५१ अपघात झाले. बसमुळे झालेल्या अपघातांची संख्या ५७ तर कारच्या अपघातांची संख्या १५१ इतकी आहे. या तिन्ही वाहनांच्या अपघातांमध्ये ३६९ जणांचा बळी गेला.

‘एपीआय’, ‘पीएसआय’च्या ८१ टक्के जागा रिक्त
नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत ‘एपीआय’ व ‘पीएसआय’ची एकूण ४८ मंजूर पदे आहेत. यापैकी केवळ ६ ‘एपीआय’ व ३ ‘पीएसआय’ नियुक्त असून ३९ जागा रिक्त आहेत. 

प्रमुख मार्गांवर झालेले अपघात
मार्ग                अपघात        मृत्यू        जखमी
नागपूर-अमरावती    ४१            १८        २८
नागपूर-चंद्रपूर        २८०            १६०        १६७
नागपूर-यवतमाळ    २५            २५        २५
नागपूर अकोला        ९३            ४२        १२९
 

Web Title: Highways became the trap of death, more than 1,400 accidents in 9 months; 832 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.