हिंगणा, काटोलमध्ये कोरोनाची साखळी तुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:49+5:302020-12-08T04:08:49+5:30
हिंगणा/काटोल/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात सोमवारी ५० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या ...
हिंगणा/काटोल/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यात सोमवारी ५० नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने घटन असताना, काटोल आणि हिंगणा तालुक्यातील कोरोनाची साखळी अद्यापही कायम आहे.
हिंगणा तालुक्यात सोमवारी ९० नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यातील सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात डिगडोह येथील तीन, वानाडोंगरी दोन तर टेंभरी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,६२८ वर पोहोचली आहे. यातील ३,३५१ रुग्ण बरे झाले आहेत.
काटोल तालुक्यात ८६ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. यात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील जानकीनगर येथील एक रुग्ण तर ग्रामीण भागामध्ये कोंढाळी आणि रिधोरा येथे प्रत्येकी दोन तर घरतवाडा, सोनोली आणि राहुळगाव येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. रामटेक तालुक्यात दोन रुग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील काचूरवाही आणि शीतलवाडी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. सध्या तालुक्यातील बाधितांची संख्या ८५६ झाली आहे. यातील ७७० रुग्ण आतापर्यंत बरे झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.