हिंगणा औद्योगिक वसाहतीत वीजवाहिनीची उंची वाढवली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:06 AM2021-06-03T04:06:42+5:302021-06-03T04:06:42+5:30

नागपूर : हिंगणा औद्यौगिक वसाहतीत अवजड वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या एका उच्च वीजवाहिनीची उंची वाढविण्याचे काम बुधवारी करण्यात आले. ...

Hingana Industrial Estate Power Line Increased () | हिंगणा औद्योगिक वसाहतीत वीजवाहिनीची उंची वाढवली ()

हिंगणा औद्योगिक वसाहतीत वीजवाहिनीची उंची वाढवली ()

Next

नागपूर : हिंगणा औद्यौगिक वसाहतीत अवजड वाहनांच्या वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या एका उच्च वीजवाहिनीची उंची वाढविण्याचे काम बुधवारी करण्यात आले. सकाळी ९ वाजताच्या सुमारास कामाला सुरुवात करण्यात आली. प्रशिक्षित मनुष्यबळासोबतच क्रेनची मदत घेऊन दुपारी ४ वाजता हे काम पूर्ण करण्यात आले.

हिंगणा पोलीस ठाण्याजवळ असणाऱ्या या उच्च दाब वीजवाहिनीची उंची सततच्या डांबरीकरणामुळे कमी झाली होती. यामुळे येथून जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी महावितरणची वीजवाहिनी अडथळा ठरली होती. कमी उंचीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. महावितरणच्या बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल लांडे आणि हिंगणा उपविभागीय कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय विटणकर यांनी सदर वीजवाहिनी स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. यासाठी जुन्या वीज खांबाच्या ऐवजी ४ नवीन वीज खांब नवीन जागी उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी बराच काळ वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार होता, सोबतच रस्त्याच्या मधोमध काम करायचे असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता होती.

Web Title: Hingana Industrial Estate Power Line Increased ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.