हिंगणघाट जळित प्रकरण; अंकिताच्या बलिदानाने राज्यातील महिला-मुलींना मिळाली शक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2022 07:10 AM2022-02-10T07:10:00+5:302022-02-10T07:10:02+5:30
Nagpur News जिवंतपणी समाजाला एक सक्षम पिढी देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिने मृत्यूनंतर राज्यातील तमाम महिला, मुलींना शक्ती कायद्याच्या माध्यमातून सुरक्षेची कवचकुंडले उपलब्ध करून दिली.
नरेश डोंगरे
नागपूर : जिवंतपणी समाजाला एक सक्षम पिढी देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या प्राध्यापिका अंकिता पिसुड्डे हिने मृत्यूनंतर राज्यातील तमाम महिला, मुलींना शक्ती कायद्याच्या माध्यमातून सुरक्षेची कवचकुंडले उपलब्ध करून दिली.
नराधम विकेश नगराळे याने अंकिताची अमानुष हत्या केली. अंकिता त्यावेळी नराधम नगराळेसोबत संघर्ष करू शकली नाही. मात्र, राज्यातील महिला, मुलींवर अशाप्रकारे यापुढे कोणीही अत्याचार करण्याचा निर्ढावलेपणा दाखवणार नाही, अशी व्यवस्था अंकितामुळे झाली. कारण तिच्या हत्येनंतर निर्माण झालेला जनक्षोभ लक्षात घेऊन सरकारने राज्यात शक्ती कायदा अस्तित्वात आणण्यासाठी पावलं उचलली. २३ डिसेंबर २०२१ रोजी विधानसभेत
सत्ताधारीच नव्हे, तर विरोधकांनीही या कायद्याच्या मंजुरीवर एकमत नोंदविले. हा कायदा अस्तित्वात आणण्यापूर्वीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
असा आहे शक्ती कायदा...
* बलात्कारप्रकरणी अजामीनपात्र गुन्हा
* दुर्मिळ प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड
* ओळखीच्या व्यक्तीने बलात्कार केल्यास जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप आणि दंडाची तरतूद
* अतिशय क्रूर महिला अत्याचार गुन्ह्याप्रकरणी मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद
* वय वर्ष १६ पेक्षा कमी असलेल्या मुलींवर अत्याचार झाल्यास मरेपर्यंत जन्मठेप.
सामूहिक बलात्कार - २० वर्षे कठोर जन्मठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप, १० लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड
* १६ वर्षांखालील मुलीवर सामूहिक बलात्कारप्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप, दहा लाख रुपये दंड
* १२ वर्षांखालील मुलीवर अत्याचार - मरेपर्यंत कठोर जन्मठेप शिक्षा आणि दहा लाख रुपये दंड
* पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा