आरक्षणामुळे इच्छुकांना हिरमाेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:32+5:302020-12-11T04:27:32+5:30
नरखेड : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण साेडत आठ वर्षीय रक्षित गाेमकाळे याच्या हस्ते गुरुवारी (दि. १०) पंचायत समितीच्या ...
नरखेड : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण साेडत आठ वर्षीय रक्षित गाेमकाळे याच्या हस्ते गुरुवारी (दि. १०) पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आली. या आरक्षणामुळे काही इछुकांचा हिरमाेड झाल्याचे दिसून आले. यात ३२ गावांमध्ये सर्वसाधारण (१६ महिला व १६ पुरुष), ११ गावात अनुसूचित जाती (६ महिला व ५ पुरुष), आठ गावात अनुसूचित जमाती (४ महिला, ४ पुरुष) आणि १९ गावांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (९ महिला १० पुरुष) या प्रवर्गातील सरपंच असणार आहे. हे आरक्षण २०२० ते २०२५ या काळात हाेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना लागू असणार आहे.
देवळी, अंबाडा (सायवाडा), अंबाडा (देशमुख), बेलाेना, खंडाळा (बु), पिंपळगाव (राऊत), जामगाव (बु), आरंभी, मालापूर, खेडी (गाेगाे), जुनाेना (फुके), गाेधनी (गायमुख), माेगरा, नारसिंगी, बानाेर (चंद्र) व वडविहिरा येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी तर माणिकवाडा, दातेवाडी, सायवाडा, सिंजर, खराळा, मेंढाला, आग्रा, येणीकाेणी, माेहदी (दळवी), खरसाेली, माेहदी (धाेत्रा), खराशी, परसाेडी (दीक्षित), खापरी (केणे), विवरा व वडेगाव (उमरी) येथील सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केले आहे.
जलालखेडा, उमठा, दिंदरगाव, भारसिंगी व खापा (घुडन) येथील सरपंचपद अनुसूचित जाती तसेच भिष्णूर, तीनखेडा, रामठी, मायवाडी, माेहगाव (भदाडे) व घाेगरा येथील सरपंचपद अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित केले आहे. खैरगाव (पेठ), इस्माईलपूर, खेडी (कर्यात) व वाढाेणा येथील सरपंचपद अनुसूचित जमाती तसेच थुगाव (निपाणी), देवग्राम (थुगावदेव), मदना व सावरगाव येथील सरपंचपद अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांच्या वाट्याला गेले आहे.
सिंगारखेडा, लाेहारीसावंगा, पिपळा (केवळराम), हिवरमठ, येरला (इंदाेरा) व महेंद्री येथील सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) तर जामगाव (खुर्द), खरबडी, थडीपवनी, सिंदी, उमरी, दावसा, बानाेर (पिठाेरी), थाटुरवाडा व साखरखेडा येथील सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याप्रसंगी तहसीलदार डी. जी.जाधव, नायब तहसीलदार विजय डांगाेरे, भागवत पाटील, राजेश नितनवरे, सिद्धार्थ नितनवरे, गुणवंत ढाेके यांच्यासह तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक उपस्थित हाेते.