४० सफाई कामगारांना कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:16+5:302021-05-06T04:07:16+5:30
नागपूर : डागा रुग्णालय प्रशासनाने गेल्या १० वर्षांपासून सफाई काम करणाऱ्या ४० महिला कर्मचाऱ्यांना कुठलीही नोटीस न देता कामावरून ...
नागपूर : डागा रुग्णालय प्रशासनाने गेल्या १० वर्षांपासून सफाई काम करणाऱ्या ४० महिला कर्मचाऱ्यांना कुठलीही नोटीस न देता कामावरून कमी केले. या महिलांना कामावर परत घेण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवी पराते यांच्या नेतृत्वात डागा रुग्णालयापुढे आंदोलन करण्यात आले. डागा रुग्णालयाचे डीन व आरोग्य अधिकारी याबाबतीत कुठलीच भूमिका घेत नसल्याने आंदोलकांनी आमरण उपोषणाची भूमिका घेतली आहे. आंदोलनात लक्ष्मीताई सावरकर, शेख मोसीन, प्रमोद गारोडी, संकेत नागपूरकर, अविनाश पार्डीकर, पवन हेडाऊ, निखिल चाफेकर, सैयद खिजार अली , कादर खान, प्रशांत तिजारे, इब्राहिम खान, वैभव देशमुख यांचे उपस्थित होते.
वारकरी मंचातर्फे अन्नदान
()
नागपूर : वारकरी मंचातर्फे लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर वास्तव्य असलेल्यांची उपासमार होऊ नये म्हणून अन्नदान करण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्हा सचिव मयूर वाजगे, निशिगंधा इंगुळकर, मनीष ठवकर, युवराज बरघाटे, हिमांशू हावरे, राजेश नेरकर यांचा सहभाग आहे.
मृताच्या कुटुंबीयांना ५ लाखाची मदत द्या
नागपूर : अख्खा देश कोरोनामुळे प्रभावित झाला आहे. राज्यातील व्यवसाय, उद्योग बंद आहेत. सामान्यांचे उपचाराअभावी जीव जात आहेत. राज्यात मृतांचा आकडा ७० हजारापर्यंत गेला आहे. सामान्यांसह मध्यमवर्गाला कोरोनाची चांगलीच झळ बसत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने कोरोना महामारी घोषित करून ज्यांच्या घरातील लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, त्यांना ५ लाख रुपयांची मदत करावी. तसेच गरिबांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रीय मेडिकल सुविधा हक्क परिषदेचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.