अंकुर सीड्सचा सामाजिक उपक्रमात हिरीरीने पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:09+5:302021-07-09T04:07:09+5:30

नागपूर : कोरोना काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानुसार विविध संस्थांना ५० लाख आणि रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना ५० ...

Hirri's initiative in the social enterprise of Ankur Seeds | अंकुर सीड्सचा सामाजिक उपक्रमात हिरीरीने पुढाकार

अंकुर सीड्सचा सामाजिक उपक्रमात हिरीरीने पुढाकार

Next

नागपूर : कोरोना काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानुसार विविध संस्थांना ५० लाख आणि रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना ५० लाख रुपये किमतीच्या ३० हजार लॅपटॉप बॅगचे वाटप आणि रक्तपेढी व अनेक संस्थांना अंकुर सीड्स प्रा. लि.तर्फे उपकरणे उपलब्ध करून देताना आर्थिक मदत केली आहे. कंपनी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीनुसार अनेक समाजाेपयोगी उपक्रम राबवित असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक माधव शेंबेकर आणि कार्यकारी संचालक विशाल उमाळकर यांनी दिली.

उमाळकर यांनी लोकमतच्या रक्तदान शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, कंपनी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान करणाऱ्यांना एक वर्षांपासून लॅपटॉप बॅगचे वाटप करीत आहे. याशिवाय ऑक्सिजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. अकोल्यातील हेडगेवार रक्तपेढीला उपकरणे आणि नागपुरात हेडगेवार हॉस्पिटलला सोनोग्राफी मशीन, मलकापूर व कळमेश्वर येथे प्रत्येकी १०० ट्री-गार्ड, कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी काटोल, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, बुटीबोरी येथील नगर परिषदेला ई-रिक्षा, महावीर इंटरनॅशनल सर्व्हिसेसला रुग्णाच्या डायलेसिसकरिता रोख रक्कम दिली आहे.

उमाळकर म्हणाले, खामगाव आणि सावनेर येथील मूक व बधीर संस्थेला नवजात व लहान मुलांसाठी उपकरणे, नागपूर, बुलडाणा, अकोला, वर्धा येथे शाळकरी मुलांना नोटबुकचे वाटप, नागपुरातील अंध विद्यालयाला उपकरणे, विशेष दिव्यांगांना बेड व खुर्च्यांसाठी मैत्री परिवारला मदत, व्हीआयएला नॉलेज सिरीजकरिता स्पॉन्सरशिप आणि एनआयपीएमच्या माध्यमातून ऑनलाईन कोर्सेससाठी आणि निसर्ग विज्ञान मंडळाला मदत केली आहे.

सीएसआरअंतर्गत कंपनीचा मदतीचा आवाका मोठा आहे. कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाला नवजात मुलांसाठी इन्क्युबेटर, खामगाव ग्रामीण रुग्णालयात पाईपलाईन, ६० ते ७० ग्रामपंचायतींना वॉटर कुलर, वर्धा येथे पाणी संवर्धन प्रकल्प आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून दहा शाळांना ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणले. मलकापूर येथील विवेकानंद वाचनालय, शेतकऱ्यांना विविध पद्धतीचे प्रशिक्षण, ग्रामीण पोलिसांना सॅनिटायझर मशीन, महिला पोलिसाला मदत केल्याने ती वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजयी ठरली. याशिवाय हेडगेवार नेत्रपेढी व खडगी (वर्धा) देवस्थानला अ‍ॅम्ब्युलन्स प्रदान केली आहे. कंपनी सामाजिक बांधिलकी जपून विविध उपक्रम राबवित असल्याचे उमाळकर यांनी सांगितले.

Web Title: Hirri's initiative in the social enterprise of Ankur Seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.